Priyanka Gandhi : प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात, राजकारण तापायला सुरुवात
जगदीशपूर भागात पोलीस कोठडीत (Police Custody) असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) जात होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांनी यमुना एक्सप्रेस वे वर रोखलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा इथल्या जगदीशपूर भागात पोलीस कोठडीत (Police Custody) असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) जात होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांनी यमुना एक्सप्रेस वे वर रोखलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. लखनौ पोलिसांनी कलम 144 आणि कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. (Congress leader Priyanka Gandhi in Uttar Pradesh police custody)
जगदीशपूरमध्ये सफाई कर्मचारी अरुण वाल्मिकी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करत त्यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यानंतर आज प्रियंका गांधी या मृत अरुणच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दिल्लीवरुन निघाल्या होत्या. त्यावेळी यमुना एक्सप्रेस वे च्या एन्ट्री पॉईन्टवर पोलिसांनी प्रियंका यांचा ताफा अडवला. पोलिसांनी प्रियंका यांनी परत जाण्याचं आवाहन केलं. मात्र, प्रियंका गांधी पुढे जाण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर पोलिसांनी अखेर प्रियंका यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली.
Lucknow | Congress’ Priyanka Gandhi Vadra & her convoy stopped by Police on their way to Agra
The moment I try to visit any place other than the party office, then they (Administration) try to stop me…It is also causing inconvenience to the public: Priyanka Gandhi Vadra pic.twitter.com/zygQqygHOj
— ANI UP (@ANINewsUP) October 20, 2021
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनौमध्ये सुमारे अर्ध्या लोकसंख्येची म्हणजे महिलांची मोठी घोषणा केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला उमेदवारांना 40 टक्के तिकिटे देईल. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले. त्या म्हणाल्या की, ज्याला स्वारस्य असेल त्यांनी पुढे येऊन अर्ज करा, आम्ही त्यांना तिकीट देऊ.
प्रियंका गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांबाबत हा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकतो’ हा काँग्रेसचा नारा आहे.आम्हाला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावे लागेल. गुणवत्तेच्या आधारावर महिलांना तिकीट दिले जाईल. आपल्याला जाती धर्माच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
इतर बातम्या :
गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? चंद्रकांतदादांच्या ऑफरवर अशोक चव्हाणांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं, केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात व्यूहरचना?
Congress leader Priyanka Gandhi in Uttar Pradesh police custody