प्रियंका गांधी यांच्या 5 मागण्या, रावण दहन ते इंदिरा गांधींची आठवण, धडाकेबाज भाषणात काय-काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीची दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य सभा पार पडली. या सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी रामायणाचं महत्त्व सांगितलं. हे सांगत असताना त्यांनी आपल्या आजी इंदिरा गांधी यांच्यासोबतची एक आठवणही सांगितली.
दिल्लीच्या रामलीला मैदानात आज इंडिया आघाडीची महासभा पार पडली. या सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगाकडे 5 महत्त्वाच्या मागण्या केल्या. तसेच त्यांनी रामायणाचं उदाहरण देत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “मला इंडिया आघाडीची पाच सूत्र मागण्या वाचण्यास सांगण्यात आलंय. त्याआधी मला एक छोटीसी गोष्ट मला सांगायची आहे. दिल्लीकरांना माहिती आहे की, रामलीला हे दिल्लीतील सुप्रसिद्ध मैदान आहे. इथे मी लहानपणापासून येत आहे. प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी इथे याच मैदानात रावणाच्या पुतळ्याचं दहन होतं. मी लहान होती तेव्हा माझी आजी इंदिरा यांच्यासोबत येत होती. त्यांच्या पायांजवळ बसून पाहत होती. त्यांनी आपल्या देशाच्या प्राचीन गाथा रामायण मला ऐकवली. आज जे सत्तेत आहेत, ते स्वत:ला रामभक्त समजतात. त्यामुळे इथे बसलेलं असताना माझ्या ही गोष्ट आली की, त्यांना या संदर्भात काही सांगायला हवं”, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
“मला वाटतं मी कर्मकांडमध्ये व्यस्त झालीय. मला वाटतं की, मी देखाव्यात मग्न झालीय. त्यामुळे मी आज इथे येऊन त्यांना आठवण करु देऊ इच्छिते की, हजारों वर्षांपूर्वीची ती गाथा काय होती आणि त्याचा संदेश काय होता. भगवान राम जेव्हा सत्यासाठी लढले तेव्हा त्यांच्याजवळ सत्ता नव्हती. त्यांच्याजवळ संसाधन नव्हते. त्यांच्याजवळ तर रथही नव्हता. रथ, संसाधने रावाणाच्या जवळ होते. सेना रावणाजवळ होती. रावणाजवळ सोनं होतं. तो तर सोन्याच्या लंकेत राहत होता. भगवान रामाजवळ सत्य, आशा, आस्था, प्रेम, परोपकार, विनय, संयम, साहस होतं”, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
“मी सत्तेत बसलेल्या सरकारमध्ये सर्व सदस्यांना, आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करुन देऊ इच्छिते, रामांच्या जीवनगाथेचा संदेश काय होता? सत्ता सदैव राहत नाही. सत्ता येते आणि जाते. अहंकार एकेदिवशी ढळून पडतो. हाच संदेश श्रीरामांचा आणि त्यांच्या जीवनाचा होता”, अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी मांडली.
प्रियंका गांधी यांनी इंडिया आघाडीच्या या पाच मागण्या वाचून दाखवल्या :
- 1) भारतीय निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीत समान संधी सुनिश्चित केली पाहिजे.
- 2) निवडणूक आयोगाकडून निवडणुकीत हेराफेरा करण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षांच्या विरोधात इनकम टॅक्स, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणाद्वारे केल्या जाणाऱ्या दबावाची कारवाई रोखली गेली पाहिजे
- 3) हेमंत सोरेन, आणि अरविंद केजरीवाल यांना तातडीने सोडलं जावं
- 4) निवडणूक काळात विरोधी पक्षांची आर्थिक रुपात गळा घोटण्याची कारवाई तातडीने बंद व्हायला पाहिजे.
- 5) निवडणुकीचा उपयोग करुन भाजपकडून बदल्याच्या भावनेत जबरदस्ती वसुली, धनशोधाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या निगरानीखाली एक एसआयटी गठीत व्हायला हवी.