तेव्हा तो दिवस ‘अच्छा दिन’ म्हणून जाहीर करा; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका

वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. (priyanka gandhi slams modi government over petrol price hike)

तेव्हा तो दिवस 'अच्छा दिन' म्हणून जाहीर करा; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका
प्रियंका गांधी, महासचिव, काँग्रेस
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 3:09 PM

नवी दिल्ली: वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ज्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नाहीत. तो दिवस अच्छा दिन म्हणून घोषित करा, अशी खोचक टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. (priyanka gandhi slams modi government over petrol price hike)

प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरून वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आठवडाभरात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाही त्या दिवसाला भाजप सरकारने अच्छा दिन म्हणून जाहीर केलं पाहिजे. कारण वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला प्रत्येक दिवस हा महंगे दिनच आहे, अशी खोचक टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी या पोस्ट सोबत नवी दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे भावही दिले आहेत. हे दर कालचे आहेत. तसेच इंधन दरवाढीचा हा अकरावा दिवस असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका निष्फळ

सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत 11 फेऱ्यांमध्ये चर्चा झालीय. मात्र, अद्याप आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे चर्चेतून मार्ग काढण्यास शेतकरी संघटना आणि सरकार दोन्ही तयार आहेत. असं असलं तरी मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलनावर कोणताही चर्चा पुढे सरकलेली नाही. शेतकरी आंदोलक कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत.

आतापर्यंत 200 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी देशभरातले शेतकरी नवी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. गेली अडीच महिने शेतकरी कशाचीही पर्वा न करता आपल्या मागण्यांसाठी लढत आहे. या लढाईत 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागलेत.

शेतकरी आंदोलनाचा वाढता प्रभाव

आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलाय. याच पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात शेतकरी आंदोलन टिकण्यासाठी एसी आणि कुलरची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी सरकारने आम्हाला विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. (priyanka gandhi slams modi government over petrol price hike)

संबंधित बातम्या:

बेडरपणे ‘सामना’ करणारे लोक, महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारचा बुरखा फाडला; सामनातून मोदींवर टीकेचे बाण

मोदीजी देशभक्त आणि राष्ट्रद्रोहींमधला फरक ओळखा, प्रियांका गांधी कडाडल्या

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

(priyanka gandhi slams modi government over petrol price hike)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.