Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियंका गांधींची देवेंद्र फडणवीसांवर टीका; व्हिडीओ ट्विट करून म्हणाल्या…

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. (Priyanka Gnadhi Accuses Devendra Fadnavis of Hoarding remdesivir)

प्रियंका गांधींची देवेंद्र फडणवीसांवर टीका; व्हिडीओ ट्विट करून म्हणाल्या...
priyanka gandhi
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 3:35 PM

नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. (Priyanka Gnadhi Accuses Devendra Fadnavis of Hoarding remdesivir)

प्रियंका गांधी यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस ठाण्यातील पोलिसांना धारेवर धरतानाच व्हिडीओही पोस्ट केला आहे. जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडेसिवीरची मागणी होत आहे. प्राण वाचवण्यासाठी रेमडेसिवीर मिळावी म्हणून लोक वणवण भटकत आहेत. त्याचवेळी एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपच्या नेत्याने रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

भाजपचे प्रत्युत्तर

दरम्यान, भाजपने प्रियंका गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी यांनी थोडा अभ्यास करून बोललं पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्तेत आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजन आणि बेडही मिळत नाहीत. महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे. प्रियंका गांधी यांनी किमान महाराष्ट्र सरकारकडून तरी याचा हिशोब मागितला पाहिजे, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड आणि आता प्रियंका गांधी फडणवीसांवर ट्विट करून टीका करत आहेत. हे लोक फडणवीसांना घाबरत आहे का? असा सवाल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. तर, प्रियंका यांनी अज्ञानापोटी माहिती नसताना वरिष्ठ नेत्यावर टीका केली आहे. त्यांचं वक्तव्य कीव करण्यासारखं आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार झाला असेल तर पकडा आणि जेलमध्ये टाका, असं आव्हानच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे.

नेमका प्रकार काय?

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. (Priyanka Gnadhi Accuses Devendra Fadnavis of Hoarding remdesivir)

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

(Priyanka Gnadhi Accuses Devendra Fadnavis of Hoarding remdesivir)

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.