Delhi farmers protest | आंदोलक शेतकऱ्यांचे थेट ब्रिटनच्या खासदारांना पत्र, काय आहे नेमकं कारण?
शेतकऱ्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना भारतात येऊ देणार नसल्याचं म्हटलंय.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र, या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केल्याचं दिसतंय. या शेतकऱ्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना भारतात येऊ देणार नसल्याचं म्हटलंय. त्यासाठी शेतकरी थेट ब्रिटिश खासदारांना पत्र लिहणार आहेत. (protesting farmers will stop Boris Johnson to visit India on occasion of Republic Day)
येत्या प्रजासत्ताक दिनी आयोजित शासकिय कार्यक्रमात (26 जानेवारी) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुख्य अतिथी म्हणून भारतात येणार आहेत. त्यांना भारतात न येऊ देण्याची भूमिका दिल्लीच्या सीमेवर ( सिंधू बॉर्डर) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना, जम्हूरी किसान सभेचे महासचिव कुलवंत सिंह यांनी सांगितलं की, “ब्रिटनचे पंतप्रधान 26 जानेवारी रोजी भारताचा दौरा करणार आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत जॉन्सन यांना भारतात न पाठवण्याचे आवाहन आम्ही ब्रिटिश खासदारांना करणार आहोत. त्यासाठी आम्ही लवकरच त्यांना पत्र लिहणार आहोत. तसेच, केंद्राने दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बुधवारी निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
The UK PM is scheduled to visit India on 26th January. We are writing to British MPs asking them to stop the UK PM from visiting India till the time farmers’ demands are not met by the Indian government: Kulwant Singh Sandhu, farmer leader from Punjab at Singhu border https://t.co/m2Z0ReXFrd
— ANI (@ANI) December 22, 2020
27 वर्षांनतर ब्रिटनचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे
पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी बोरिस जॉन्सन हे प्रमुख पाहुणे आहेत. त्याआधी 1993 साली ब्रिटनचे पंतप्रधान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनतर बोरिस जॉन्सन भारतात येत आहेत. त्यामुळे त्यांची भारत भेट आणि त्यांच्या भेटीस शेतकऱ्यांचा विरोध सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, कृषी कायद्यांना मागे घ्यावे अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांकूडन होत आहे. शेकऱ्यांच्या या मागणीवर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, सरकारचे प्रस्ताव फेटाळून शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यानंतर आता ब्रिटिश पंतप्रधानांना भारतात न येऊ देण्याच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
कृषी कायद्यावरुन भाजप Vs पवार, पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत फडणवीसांकडून घेरण्याचा प्रयत्न
(protesting farmers will stop Boris Johnson to visit India on occasion of Republic Day)