Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार

Pune Meteorological Department : पुणे शहरात हवामानाचा अंदाज बिनचूक करण्यासाठी एक प्रकल्प येणार आहे. त्यामुळे देशभरातील हवामानाचा अंदाज अचूक करता येणार आहे. त्याचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार
PUNE IMD
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली : पुणे हवामान विभागाकडून नियमित हवामानाचा अंदाज दिला जातो. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो त्याचा अंदाज वर्तवण्याचे काम हवामान विभागातील शास्त्रज्ञ नेहमी करत असतात. आता हा अंदाज अधिकच बिनचूक होणार आहे. कारण त्यासाठी तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात माहिती दिली. यामुळे भारत चीनला सुद्धा मागे टाकणार आहे. हवामानाचा बिनचूक अंदाज मिळणार असल्याचा फायदा देशभरातील शेतकरी अन् मासेमारी करणाऱ्यांनाही होणार आहे.

काय मिळणार भारताला

केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय किरेन रिजिजू यांनी सांगितले की, देशाला हवामानाचा अंदाजासाठी सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारताकडे 18 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटर असणार आहे. या संगणकांच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज करता येतो. त्यामुळे हवामानशास्त्राच्या क्षेत्रात भारत आता चीनला मागे टाकणार आहे. आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन आणि जपानमध्ये असे सुपर कॉम्प्युटर आहेत. पुढील वर्षी मार्चपासून भारत या देशांसारख्या सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवू शकणार आहे.

हे सुद्धा वाचा

आता भारताकडे काय आहे

भारताकडे सध्या प्रत्युष आणि मिहीर हे सर्वात शक्तिशाली नागरी सुपर कॉम्प्युटर आहेत. तथापि, या वर्षाच्या अखेरीस देशाला उपलब्ध होणार्‍या 18 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटरची नावे अद्याप देण्यात आलेली नाहीत. हे संगणक फ्रान्समधून आयात करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता. या अंतर्गत भारत 2025 पर्यंत 4,500 कोटींचे उच्च-कार्यक्षमता संगणक खरेदी करेल.

कोणाला मिळणार सुपर कॉम्प्युटर

भारताला लवकरच सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. या शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरची किंमत 900 कोटी आहे. या सुपर कॉम्प्युटरची क्षमता भारतातील सध्याच्या सुपर कॉम्प्युटरपेक्षा तिप्पट आहे. सध्या, भारतातील सुपर कॉम्प्युटर 12 किलोमीटरच्या रिझोल्यूशनसह हवामानाचा अंदाज लावतात. आणि नवीन सुपर कॉम्प्युटर 6 किमी रिझोल्यूशनसह तेच करेल. मिहीर आणि प्रत्युष नावाचे सुपर कॉम्प्युटर्स 2018 साली लाँच करण्यात आले. यासाठी 438 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आयआयटीएम आणि एनसीएमआरडब्ल्यूएफमध्ये नवीन सुपर कॉम्प्युटर बसवले जाणार आहेत. ही केंद्रे पुणे आणि नोएडा येथे आहेत.

हे ही वाचा

Monsoon Update : देशभरात मान्सून कधी पसरणार, IMD कडून आले महत्वाचे अपडेट

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.