नवी दिल्ली : पुणे, मुंबई शहरात आपल्या स्वप्नातील घर घेण्याचा विचार अनेक जण करतात. त्यासाठी आयुष्यभराची पुंजी जमा केली जाते. त्यानंतर या शहरांमध्ये हक्काचे घर घेता येते. देशातील मेट्रो शहरांमध्ये एप्रिल ते जून २०२३ मध्ये घरांच्या किंमती कशा होत्या, यासंदर्भातील अहवाल समोर आला आहे. देशात सर्वाधिक दर कोणत्या शहरात वाढले, याची माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पुणे, मुंबई शहरांमध्ये घरांच्या किंमती वाढल्या आहेत. या शहरांमध्ये घर घेण्यासाठी आता जास्त पैसै मोजावे लागणार आहेत.
देशात मागणी वाढल्यामुळे घरांच्या किंमती सहा टक्के वाढल्या आहेत. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किंमती 7,000 ते 7,200 स्केअर फूट होती. मागील वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात सहा टक्के वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकोता, दिल्ली या शहरांमधील घरांच्या किंमती वाढल्या असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
घरांच्या किंमती का वाढल्या? या संदर्भात बोलताना प्रोटायगर डॉट कॉम अन् हॉसिंग डॉट कॉमचे प्रमुख अनिकेत सूद म्हणाले की, देशातील अनेक शहरांमध्ये घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढल्या आहेत. नवीन प्रकल्पांमध्ये घरे घेणारे ग्राहक वाढत आहेत. विविध प्रकारच्या ॲमिनिटज असणाऱ्या घरांना जास्त मागणी आहे. लोक दिल्ली अन् जवळपास घरे घेण्यास प्राधान्य देत आहे.
पुणे, मुंबईत घरांच्या किंमती तीन टक्के वाढ झाली आहे. पुणे शहरात घरांचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० स्केअर फुटापर्यंत गेले आहेत. मुंबईत घर घेणे सर्वात महाग आहे. याठिकाणी घर १० हजार १०० ते १० हजार ३०० रुपये स्केअर फुटापर्यंत गेले आहेत. या तिमाहीत सर्वाधिक किंमती अहमदाबादमध्ये सात टक्क्यांनी वाढल्या आहेत. या शहरात ३७०० ते ३९०० स्केअर फुटापर्यंत घरांच्या किंमती आहेत, अशी माहिती अहवालात दिली आहे.