Punjab Election Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आपच्या हाती सत्ता, काँग्रेस दुसऱ्या नंबरला तर भाजप?; वाचा एक्झिट पोल काय सांगतो?
Punjab Election Exit Poll Results 2022: पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. पंजाबचे एक्झिट पोल हाती आले असून पंजाबमध्ये सत्तांतर होताना दिसत आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची सत्ता येताना दिसत आहे.
चंदीगड: पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit Poll result 2022) यायला सुरुवात झाली आहे. पंजाबचे (Punjab Assembly Election) एक्झिट पोल हाती आले असून पंजाबमध्ये सत्तांतर होताना दिसत आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची (aap) सत्ता येताना दिसत आहे. एक्झिटपोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 56-61 जागा मिळताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ भगवंत मान यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार पंजाबच्या सत्तेचं गणित बदलल्यास आपच्या हाती दिल्लीपाठोपाठ पंजाब सारखं महत्त्वाचं राज्य येण्याची शक्यता आहे. तर, पंजाबमध्ये काँग्रेस दुसऱ्या आणि भाजप तिसऱ्या स्थानावर जाणार असल्याचं चित्रं आहे. त्यातही भाजपला केवळ एक ते सहाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
TV9 Bharatvarsh/Polstratने पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार आम आदमी पार्टीची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपला बहुमत मिळताना दिसत आहे. दिल्लीनंतर पंजाबमध्येही आपची सत्ता येणार आहे. आपची सत्ता असलेलं पंजाब हे आपसाठी दुसरं राज्य ठरणार आहे. TV9 भारतवर्ष/Pollstart च्या एक्झिट पोलनुसार आपला 56-61 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 24-29 जागा मिळताना दिसत आहेत. तर अकाली दलाला 22-26 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी अकाली दल आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होताना दिसत आहे. तर भाजप आघाडीला केवळ 1 ते 6 जागा मिळताना दिसत आहेत. तर इतरांना किमान 3 जागा मिळण्याची शक्यताही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. या निवडणुकीत आपने 41.2 टक्के, काँग्रेसला 23.2 टक्के, अकाली दलाला 22.5 टक्के, भाजप आघाडीला 7.2 टक्के आणि इतरांना 5.9 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे-अॅक्सिचा एक्झिट पोल काय सांगतो?
इंडिया टुडे-अॅक्सिसचा एक्झिट पोलही आला आहे. या पोलनुसार पंजाबमध्ये आपला बंपर जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस पोलनुसार पंजाबमध्ये आपला 76-90 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 19 ते 31 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला अवघ्या एक ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या पोलनुसार अकाली दलाला मात्र 7 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व एक्झिट पोलमधील समान धाग्यानुसार काँग्रेसला पंजाबमध्ये मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. तर सर्वांनीच आपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
ईटीजीही म्हणजे आपच
ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपला 70-75 जागा मिळणार आहेत. काँग्रेसला 23-27 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 3-7 जागा मिळणार असून अकाली दलालाही 3-7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
Up Election Exit polls : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?
Exit Poll Results 2022 LIVE : उत्तर प्रदेश गोव्यात भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता येण्याची शक्यता