Bhagwant Mann Cabinet : भगवंत मान यांची टीम ठरली, 10 मंत्र्यांची यादी जाहीर
पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाबच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Expansion) समावेश असणाऱ्या नेत्यांना शपथ देतील.
नवी दिल्ली: पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाबच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Expansion) समावेश असणाऱ्या नेत्यांना शपथ देतील. शपथविधीचा कार्यक्रम उद्या सकाळी 10 वाजता चंदीगडमध्ये होईल. मंत्रिपदाची शपथ 10 नेत्यांना दिली जाणार आहे. आपच्या 10 नेत्यांची नावं जाहीर झाली आहेत. आपककडून हरपाल सिंग छिमा, डॉ. बलजीत कौर, हरभजन सिंग ईटीओ, विजय सिंगला, गुरमीर सिंग मीत हैर, हरज्योत सिंग बैन्स, लाल चंद कतरुछक, कुलदीप सिंग दहिवाल, ललजित सिंग भुल्लर, ब्रम शंकर या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर दुपारी 12.30 मिनिटांनी कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे.
कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार?
A total of 10 ministers to take oath as Cabinet Ministers of Punjab tomorrow.
AAP MLAs Harpal Singh Cheema, Dr. Baljit Kaur, Harbhajan Singh ETO, & Dr. Vijay Singla to take oath as ministers.
— ANI (@ANI) March 18, 2022
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि नवनिर्वाचित आमदारांना पंजाबच्या 16 व्या विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन देखील सुरु झालं आहे. प्रोटेम स्पीकर म्हणून इंदरबीर सिंह निज्जर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. आपच्या आमदारांमध्ये अनेक जण पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आपचे भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात शपथ घेतली होती. आता त्यांच्या सोबत आता 10 आमदारांना मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यावर घेतलेल्या पहिल्या बैठकीत मान काय म्हणाले?
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी पहिल्या बैठकीला संबोधित केलं. यासंदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती दिली आहे. राज्यातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत लोकसेवकाप्रमाणं वर्तन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाद्वारे भगवंत मान यांचा नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील संबंध चागंले राहावेत असा प्रयत्न दिसतो. नवी दिल्लीत देखील आपची लोकप्रियता वाढण्याचं देखील एक कारण होतं.
इतर बातम्या :
तुमचा आपत्कालीन निधी आहे तर या चुका टाळा; नाही तर मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार
Video : BJP नेत्यांचे बिंग फोडणारी CD मलिकांकडे म्हणून अटक, ज्युन्या भाषणाच्या Videoने खळबळ