तुफ्फान चर्चेतला वाद, 30 वर्ष, 14 एकर महाल, 18 विंटेज कार, 1000 कोटींचे दागिने कुणाला मिळाले? सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहिला?

पंजाबच्या फरीदकोट येथील महाराजा सर हरिंदर सिंह बराड यांच्या संपत्तीचा हा वाद आहे. २० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वाद अनेक वर्षांपासून सुरु आहे. आज अखेर सुप्रीम कोर्टाने राजाच्या मुलींना ही संपत्ती मिळावी, असे आदेश दिलेत.

तुफ्फान चर्चेतला वाद, 30 वर्ष, 14 एकर महाल, 18 विंटेज कार, 1000 कोटींचे दागिने कुणाला मिळाले? सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहिला?
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 30 वर्षांपासूनच्या वादावर पडदा पडलाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 6:38 PM

चंदीगडः पंजाबमधील (Punjab) एका संपत्तीचा वाद 30 वर्षांपासून सुरु होता. आज अखेर सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) या वादावर पदडा टाकला. फरीदकोटचे (Faridkot) महाराजा सर हरिंदर सिंह बराड यांच्या घराण्यातील संपत्तीचं हे भांडण होतं. ही संपत्तीही थोडी नव्हती. आज तिची किंमत 20 ते 25 हजार कोटींपर्यंत असल्याचं सांगण्यात येतंय. ही सर्व संपत्ती राजाच्या मुलींना देण्यात यावी, असा निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. मुलींविरोधात आणखी कुणी या संपत्तीवर दावा ठोकला होता, हे पाहुयात.

कोर्टाच्या आदेशानंतर ही संपत्ती राजाच्या मुलींना मिळेल. पण यापूर्वी ती महारावल खेवाजी ट्रस्टकडे होती. तेच संपत्तीची देखभाल करत होते. महारावल खेवाजी ट्रस्टने एका वारसा प्रमाणपत्राच्या आधारे या संपत्तीवर दावा ठोकला होता.

2013 मध्ये चंदिगड जिल्हा न्यायालयाने हे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. ही संपत्ती मुलींना देण्याचे आदेश दिले होते.

नंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं. तेथेही 2020 मध्ये जिल्हा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला गेला. तर मुलींसोबत त्यांच्या भावाच्या कुटुंबानाही काही भाग देण्याचं कोर्टानं म्हटलं होतं.

वाद का चिघळला?

हा वाद चिघळण्याचं मुख्य कारण म्हणजे, 1918 मध्ये राजे हरिंदर सिंह बराड 3 वर्षांचे असतानाच त्यांना राजगादीवर बसवण्यात आले. तत्कालीन सत्तेचे ते अखेरचे वंशज होते. बराड आणि पत्नी नरिंदर कौर यांना तीन मुली. अमृत कौर, दीपिंदर कौर आणि महीपिंदर कौर. एक मुलगा होता. त्याचा 1981 मध्ये अपघातात मृत्यू झाला.

या घटनेनंतर महाराजा नैराश्यात गेले. काही महिन्यांनी वारसा प्रमाणपत्र बनवण्यात आलं. संपत्तीच्या देखभालीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आली. अमृत कौर यांनी महाराजांच्या परवानगीशिवाय लग्न केलं होतं. त्यामुळे त्यांना वगळून इतर दोघींना ट्रस्टमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बनवलं गेलं. 1989 मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर हा प्रकार उघडकीस आला.

नंतर एका बहिणीचं लग्न होण्यापूर्वीच निधन झालं. त्या महींपिंदर कौर. त्यानंतर अमृत कौर यांनी 1992 मध्ये स्थानिक जिल्हा कोर्टात वारस प्रमाणपत्राला आव्हान दिलं.

कायद्यानुसार महाराज अशा प्रकारे संपूर्ण संपत्ती ट्रस्टला देऊ शकत नाहीत. कारण त्यात वारशाने आलेली संपत्ती होती, असा दावा त्यांनी केला. या वारसा प्रमाणपत्राच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.

संपत्तीचे आकडे डोळे फिरवणारे…

महाराजांची ही भव्य संपत्ती पाहून कुणाचेही डोळे विस्फारतील. यात अनेक किल्ले, महालांसारख्या इमारती, शेकडो एकर जमीन. जुन्या कार. एक मोठं बँकेचं अकाउंटही आहे.

फरीदकोटमध्ये 14 एकरांतला राजमहाल, 10 एकरांतला किला मुबारक, नवी दिल्लीचे फरीदकोट हाऊस (अंदाचे 1200 कोटी किंमत), चंदिगडचा मनिमाजरा फोर्ट (4 एकर), शिमल्याचे फरीदकोट हाऊस (260 बिघा बंगला), 18 विंटेज कार (रोल रॉयस, बेंटले, जॅग्वार आदी), 1000 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आदी संपत्ती आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.