प्रिन्स हॅरी यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवलं, वॉरंट जारी करा; महिलेची हायकोर्टात धाव

पंजाब-हरियाणाच्या कोर्टात एक भलतच प्रकरण समोर आलं आहे. (Punjab & Haryana HC dismisses lawyer’s plea seeking action against Prince Harry)

प्रिन्स हॅरी यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवलं, वॉरंट जारी करा; महिलेची हायकोर्टात धाव
Britain Prince harry
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 2:28 PM

चंदीगड: पंजाब-हरियाणाच्या कोर्टात एक भलतच प्रकरण समोर आलं आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी यांच्या विरोधात एका महिलेने कोर्टात धाव घेतली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपल्याला लग्नाचं अमिष दिलं होतं. आता ते लग्न करण्यास नकार देत असून त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावं, अशी मागणी या महिलेन याचिकेद्वारे केली आहे. तर, कोर्टाने या महिलेची याचिका फेटाळून लावली आहे. (Punjab & Haryana HC dismisses lawyer’s plea seeking action against Prince Harry)

या महिलेच्या या याचिकेवर कोर्टानेही मिश्किल टिप्पणी केली आहे. प्रिन्स हॅरी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पंजाबमधील कोणत्या तरी गावातील सायबर कॅफेत बसले असण्याची शक्यता आहे, अशी मिश्किल टिप्पणी करतानाच ही याचिका म्हणजे दिवसाढवळ्या पाहण्यात येत असलेलं स्वप्न आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

याचिका करणारी महिला वकील

विशेष म्हणजे याचिका दाखल करणारी महिला व्यवसायाने वकील आहे. तिच्या विनंतीवर कोर्टाने ही याचिका सुनावणीसाठी घेतली. परंतु, ही याचिका तथ्यहीन असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली. प्रिन्स हॅरी यांनी लवकरात लवकर लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता ते विवाह करण्यास मना करत आहेत. त्यांनी आपली फसवणूक केली आहे. त्यांच्ंया विरोधात वॉरंट जारी करा. म्हणजे आमच्या विवाहाला आणखी उशिर लागता कामा नये.

कोर्ट म्हणाले, सहानुभूती आहे

तुम्ही सोशल मीडियावरील फेक गोष्टींना सत्य मानत आहात, असं कोर्टाने म्हटलं आहे. या महिलेने तिच्या अर्जात काही ई-मेलचा उल्लेखही केला आहे. प्रिन्स हॅरी यांनी हे मेल आपल्याला पाठवले होते, असा दावा तिने केला आहे. त्यावर या प्रकरणात आम्ही आमची सहानुभूती दाखवू शकतो, असं कोर्टाने म्हटलं आहे. अर्जाचा ड्राफ्ट योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही. खोट्या आईडीद्वारे अनेक अकाऊंट्स बनवून अशाप्रकारचे मेसेज केले जातात, असं कोर्टाने म्हटलं आहे.

2018मध्ये झाला प्रिन्स हॅरी यांचा विवाह

तुम्ही कधी ब्रिटनचा प्रवास केला आहे का? असा सवालही कोर्टाने या महिलेला केला. त्यावर तिने नाही म्हटलं. प्रिन्स हॅरी यांचा विवाह 2018मध्ये मेगन मर्केल यांच्यासोबत झाला होता. मेगन अभिनेत्री आहेत. 2019मध्ये या दोघांना एक मुलगाही झाला. त्यांच्या मुलाचं नाव आर्ची आहे. (Punjab & Haryana HC dismisses lawyer’s plea seeking action against Prince Harry)

संबंधित बातम्या:

बीडमधील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?; जाणून घ्या 10 पॉइंट्समधून

अमेरिकेतील ‘गन कल्चर’चा क्रूर चेहरा समोर, 3 वर्षांच्या भावानं 8 महिन्यांच्या बाळाला घातल्या गोळ्या

प्रिन्स फिलिप-एक असे राजकुमार जे स्वत:च्या मुलांना स्वत:चे नावही लाऊ शकले नाहीत

(Punjab & Haryana HC dismisses lawyer’s plea seeking action against Prince Harry)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.