पंजाबमध्ये कॉंग्रेस अडचणीत, मुख्य नेत्याचा भाचा ईडीच्या ताब्यात, बेहिशेबी संपत्ती; अधिकारी चक्रावले

नवी दिल्लीः पंजाब विधानसभा निवडणुकीच्याआधी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचनालयाकडून (Enforcement Directorate) गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री (Chief Minister) चरणजीत सिंग चन्नी यांचा भाचा भूपेंद्र सिंग हनी यांना अैवध खाण काम केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जालंधरमधील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना रात्रभर ईडी कार्यालयात बसवून […]

पंजाबमध्ये कॉंग्रेस अडचणीत, मुख्य नेत्याचा भाचा ईडीच्या ताब्यात, बेहिशेबी संपत्ती; अधिकारी चक्रावले
charanjit singh channi
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 11:08 AM

नवी दिल्लीः पंजाब विधानसभा निवडणुकीच्याआधी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचनालयाकडून (Enforcement Directorate) गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री (Chief Minister) चरणजीत सिंग चन्नी यांचा भाचा भूपेंद्र सिंग हनी यांना अैवध खाण काम केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जालंधरमधील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना रात्रभर ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आले होते, तर शुक्रवारी सकाळी त्यांना मोहालीच्या सीबीआयसमोर हजर करण्यात येणार आहे. चन्नी यांच्या भाच्याला अटक करण्यात आल्याने पंजाबमध्ये कॉंग्रेस अडचणीत सापडले आहे. त्यांना झालेली अटक ही राजकीय अकसापोटी झाले की खरच बेहिशोबी मालमत्ता जप्त होणार याकडे आता येणार काळच ठरवणार आहे. त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री विधासभेच्या निवडणुकीत व्यस्त असताना ईडीच्या या धाडीमुळे ते आता पुन्हा अडचणीत सापडले आहेत.

अंमलबजावणी संचालनालयकडून स्पष्ट करण्यात आले की,उपेंद्र सिंग उर्फ हनी यांच्या मोहालीच्या घरावर जेव्हा ईडीने धाड टाकली तेव्हा त्यांच्याकडे आढळलेल्या कोट्यवधी रुपयांची चौकशी केली. त्या रक्कमेचा तपशील व बँकेची माहिती मागितल्यानंतर त्यांना याविषयी सांगता आले नाही. एवढी रक्कम आली कुठून यावरही काही त्यांना सांगता आले नाही. त्यांची चौकशी केल्यानंतर याप्रकरणातील अन्य दोघांचीही चौकशी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचीही वाळू उपसाप्रकरणी चौकशी

मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनाही अवैध वाळू उपसाप्रकरणीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. माजी आमदार सुखपाल सिंग खैहरा यांनी हे प्रकरण लावून धरले होते व चौकशीची मागणी केली होती. अवैध वाळू उपसाप्रकरण पंजाबमध्ये तापले तेव्हा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये चन्नी हे तंत्र शिक्षण मंत्री होते.त्यावेळी चन्नी यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यामुळे ईडीकडून आता भूपेंद्र सिंग यांच्या अवैध वाळू उपासाप्रकरणात मुख्यमंत्री चन्री यांचा सहभाग आहे का आणि त्यांच्या नावाचा वापर करुन अवैध वाळू उत्खनन करण्यात येत आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खननात त्यांनी कोट्यवधींची संपत्ती जमा केल्याचे बोलले जात आहे.

बेकायदेशीर वाळू उत्खनन

ईडीकडून समजलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी कुदरतदीप सिंग आणि भूपिंदर सिंग हनी हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज कंपनीत संदीपसह संचालक आहेत. या कंपनीची स्थापना 25 ऑक्टोबर 2018 रोजी झाली होती, जेव्हा पंजाब पोलिसांनी बेकायदेशीर खाणप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या कंपनीचे पॅड-अप भांडवल फक्त 60 हजार रुपये होते आणि एकूण अधिकृत रक्कम 5 लाख रुपये होती असे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

ओवेसींवरच्या गोळीबाराचा CCTV व्हिडीओ पाहिलात? दोन हल्लेखोर, गोळीबार आणि गाडीची धडक, काय घडलं?

Bandatatya Karadkar: कुणाबद्दल आकस नाही, द्वेष नाही, अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी

Bandatatya Karadkar | महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात गोंधळ ते माफी; वाचा बंडातात्या कराडकर चर्चेत का आले ?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.