विषारी दारुचा कहर, तब्बल 21 जणांचा मृत्यू, पंजाबमधील थरारक घटना
पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरनतारन येथे विषारी मद्य पिल्याने 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (21 death after allegedly consuming spurious liquor in Punjab).
चंदिगड : पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरनतारन येथे विषारी मद्य पिल्याने 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (21 death after allegedly consuming spurious liquor in Punjab). या घटनेनंतर संपूर्ण पंजाब हादरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी विषारी मद्य बनवणाऱ्या काही आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पंजाब सरकारकडून एक विशेष पथक नेमण्यात आलं आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याप्रकरणी मॅजिस्ट्रियल चौकशीचे आदेश दिले आहेत. जालंधरचे विभागीय पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे (21 death after allegedly consuming spurious liquor in Punjab).
Punjab Chief Minister Captain Amarinder Singh orders a magisterial inquiry by Divisional Commissioner Jalandhar into the suspicious deaths of 21 people, allegedly due to consumption of spurious liquor, in Amritsar, Batala and Tarn Taran: Punjab Chief Minister’s Office (file pic) pic.twitter.com/jTY3EuYcI3
— ANI (@ANI) July 31, 2020
जालंधरचे विभागीय पोलीस आयुक्त तपासासाठी कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेऊ शकतात, अशी मुभा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा ठोठावली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी नेमलेल्या विशेष पथकाकडून जलद गतीने तपास सुरु आहे. या घटनेनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात मद्य तयार करणाऱ्या कारखान्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज चार बाधित मृतशरीरांचं पोस्टमार्टम केलं जाणार आहे.
पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “विषारी मद्य पिल्याने 29 जुलै रोजी अमृतसरच्या मुच्छल आणि तंग्रा या ग्रामीण भागात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर 30 जुलै रोजी संध्याकाळी मुच्छल येथे आणखी दोन जणांचा तशाचप्रकारे मृत्यू झाला. यापैकी एका व्यक्तीला रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुच्छल गावात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बटाला शहरातही दोन जणांचा मृत्यू झाला. बटाला शहरात तर आज आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर तरनतारन येथेदेखील चार जणांचा मृत्यू झाला”, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.