अतिच झालं! खासगी रुग्णालये आणि हॉटेलांचं व्हॅक्सिनेशन पॅकेज; केंद्राचे राज्यांना कारवाईचे आदेश

| Updated on: May 30, 2021 | 10:14 AM

एकीकडे देशात व्हॅक्सिनचा तुटवडा असल्याने अनेक राज्यात धीम्यागतीने व्हॅक्सिनेशन सुरू आहे. (Pvt hospitals, star hotels flouting guidelines by offering vaccination package)

अतिच झालं! खासगी रुग्णालये आणि हॉटेलांचं व्हॅक्सिनेशन पॅकेज; केंद्राचे राज्यांना कारवाईचे आदेश
कोरोना लसीकरण
Follow us on

नवी दिल्ली: एकीकडे देशात व्हॅक्सिनचा तुटवडा असल्याने अनेक राज्यात धीम्यागतीने व्हॅक्सिनेशन सुरू आहे. अशातच काही खासगी रुग्णालयांनी हॉटेलांशी हात मिळवणी करून व्हॅक्सिनेशनचा (लसीकरण) धंदा सुरू केला आहे. या खासगी रुग्णालयांनी हॉटेलांशी संगनमत करून व्हॅक्सिनेशन पॅकेज द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अशा रुग्णालये आणि हॉटेलांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. (Pvt hospitals, star hotels flouting guidelines by offering vaccination package)

काही रुग्णालये आणि हॉटेल एकत्र मिळून व्हॅक्सिनेशन पॅकेज देत आहेत. सरकारने घालून दिलेल्या गाईडलाईनचं हे उल्लंघन आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रं लिहून ही रुग्णालये आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. काही खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स एकत्रित मिळून व्हॅक्सिनेशन पॅकेज देत असल्याचं आम्हाला समजलं आहे. हा प्रकार म्हणजे नॅशनल कोविड व्हॅक्सिनेशन प्रोग्रामच्या गाईडलाईनचं उल्लंघन आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ बंद झाला पाहिजे, असं या चिठ्ठीतून नमूद करण्यात आलं आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लसीकरणासाठी केवळ चार पर्याय

सरकारने लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात लसीकरणासाठी केवळ चार पर्याय दिले आहेत. त्यानुसार सरकारी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर, सरकारी रुग्णालयांद्वारे चालणारे खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर आणि सरकारी रुग्णालयात व्हॅक्सिनेशन केलं जात आहे. तसेच खासगी रुग्णालयांद्वारे सरकारी कार्यालयात व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बुजुर्ग आणि दिव्यांगांसाठी ग्रुप हौसिंग सोसायटीत, आरडब्ल्यूए कार्यालय, कम्युनिटी सेंटर, पंचातय भवन आणि शाळा-महाविद्यालयात व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दीड लाख नव्या रुग्णांची नोंद

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. कालच्या दिवसात देशात 2 लाख 76 हजार 309 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 वर गेला आहे. देशात 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 25 हजार 972 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 21 लाख 14 हजार 508 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Pvt hospitals, star hotels flouting guidelines by offering vaccination package)

 

संबंधित बातम्या:

कोरोना लसीसाठी अनेक देश रांगेत उभे, मग हाँगकाँग लाखों लसी कचरा कुंडीत का टाकत आहे?

लसीकरणावरुन विरोधकांचे मोदी सरकारला सवाल, नीती आयोगाकडून 7 प्रश्नांची उत्तरं

कोरोनाची दुसरी लाट आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल?; वाचा खास टिप्स

(Pvt hospitals, star hotels flouting guidelines by offering vaccination package)