Rafale | भारतीय वायुदलाचे सामर्थ्य वाढणार, फ्रान्सहून पाच राफेल विमाने रवाना
अल डाफरा एअरबेसची जबाबदारी फ्रान्स वायुदलाकडे आहे. इथे आल्यानंतर या विमानांचं परिक्षण केलं जाईल आणि इंधन भरलं जाईल.
नवी दिल्ली : भारतीय वायुदलाला नव्या ताकदीची (Rafale Fighter Aircraft Take Off From France) पंख देणारं राफेल फ्रान्सच्या हवाईपट्टीवरुन भारताच्या दिशेनं रवाना झालं. या पाचही लढाऊ विमानांना भारतीय पायलट उडवत असून ते हे विमानं अंबाला एअरबेसवर उतरवणार आहेत. फ्रान्स ते भारत प्रवासादरम्यान या पाचही लढाऊ विमानांना 28 जुलैला संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या अल डाफरा एअरबेसवर पर उतरवलं जाणार आहे, अशी माहिती आहे (Rafale Fighter Aircraft Take Off From France).
अल डाफरा एअरबेसची जबाबदारी फ्रान्स वायुदलाकडे आहे. इथे आल्यानंतर या विमानांचं परिक्षण केलं जाईल आणि इंधन भरलं जाईल. त्यानंतर 29 जुलैला सकाळी हे राफेल विमान भारतात पोहोचतील. राफेल विमानांना अंबाला एअरबेसवर तैनात केलं जाईल.
“नवीन राफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाच्या युद्ध क्षमतेत भर पडेल. योजना आखताना भारताला याचा मोठा फायदा होईल. भारताच्या ताफ्यात सामील होण्यासाठी पाच राफेल विमान आज फ्रान्सहून निघाली आहेत”, असं फ्रान्समधील भारतीय दूतावासने म्हटलं.
Rafale aircrafts maneuvered by the world’s best pilots, soar into the sky. Emblematic of new heights in India-France defence collaboration #ResurgentIndia #NewIndia@IAF_MCC @MeaIndia @rajnathsingh @Dassault_OnAir @DefenceMinIndia @PMOIndia@JawedAshraf5 @DDNewslive @ANI pic.twitter.com/FrEQYROWSv
— India in France (@Indian_Embassy) July 27, 2020
– भारताने फ्रान्सकडून 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा करार केला आहे. यापैकी पाच विमानं भारताला दिली जात आहेत (Rafale Fighter Aircraft Take Off From France).
– अंबाला एअरबेसवर पोहोचल्यानंतर राफेल विमानांना क्षेपणास्त्राने सुसज्ज केलं जाईल. यामध्ये स्कॅल्प, मेटेओर आणि हॅमर या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
– राफेलचं पहिलं पथक अंबाला येथे तर दुसरं पश्चिम बंगालच्या हशिमारा येथे तैनात केलं जाईल.
– राफेलमुळे भारतीय वायुदलाची ताकद अनेक पटीने वाढणार आहे.
– वायुदलाजवळ सध्या सुखोई, मिराज, मिग-29, जॅगुआर, LCA आणि मिग-21 सारखे फायटर जेट आहेत.
राफेल विमान
मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. मोदी सरकारने केलेल्या करारावरुन काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पण कोर्टाने मोदी सरकारला क्लीनचीट दिली.
राफेलचं वैशिष्ट्य काय?
- राफेल एक असं लढाऊ विमान आहे जो एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतो.
- राफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे.
- हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतो.
- यामध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार काय आहे?
भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 7.87 अब्ज युरो म्हणजेच जवळपास 59 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. हा व्यवहार दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये झाला. भारताची हवाई ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला. ही विमानं फ्रान्सची दसॉल्ट कंपनीने तयार केली आहेत. ही विमानं सप्टेंबर 2019 मध्ये भारताला मिळणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल 2015 रोजी फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रांसवा ओलांद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या व्यवहाराची माहिती दिली होती.
गाजावाजा झालेल्या राफेल विमानाची पहिली भरारी, राफेल गेमचेंजर ठरले, वायूसेनेची प्रतिक्रिया https://t.co/YLbRraKVek
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2019
Rafale Fighter Aircraft Take Off From France
संबंधित बातम्या :
भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?