राहुल आणि प्रियंका गांधी कोणत्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार?

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. प्रत्येक पक्ष जागांबाबत चाचपणी करत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून गेल्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूल लढवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राहुल आणि प्रियंका गांधी कोणत्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार?
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 4:59 PM

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अघाडी करण्यासाठी अनेक पक्षांमध्ये चर्चा सुरु आहेत. इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर समाजवादी पक्षाला मध्यप्रदेशात 1 जागा मिळाली आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे देखील उत्तर प्रदेशातून निवडणुका लढवत आल्या आहेत. राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना अमेठीत स्मृती इराणी यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता ते कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

राहुल गांधी कुठून लढणार?

सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. तर प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात. कारण सोनिया गांधी या आता राज्यसभेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर पहिल्यांदाच प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. राहुल गांधी येथून १५ वर्षे खासदार होते. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला.

प्रियंका गांधी कुठून लढणार?

सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रायबरेलीच्या जागेवरून प्रियंका गांधी यांना उमेदवारी मिळू शकते. दुसरीकडे, राहुल गांधी अमेठीतून पुन्हा एकदा नशीब आजमवू शकतात. 2019 प्रमाणे स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात टक्कर होऊ शकते.

स्मृती इराणी यांची टीका

नेहरू आणि गांधी कुटुंबावर केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांनी बुधवारी टीका केली होती. त्या म्हणाल्या की, ‘नामदारांनी’ अमेठीला 50 वर्षे विकासापासून वंचित ठेवले. त्यामुळे येथील जनता गरीब राहिली. अमेठीचे लोक जेव्हा दिल्लीत खासदारांना भेटायला जायचे तेव्हा एकतर खासदार परदेशात होते किंवा त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.