बहुतेक शेतकऱ्यांना कृषी कायदे माहीत नाहीत, नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल: राहुल गांधी
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Rahul Gandhi alleges PM Modi of 'trying to kill' Land Acquisition Bill)
नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांची माहिती नाही. नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul Gandhi alleges PM Modi of ‘trying to kill’ Land Acquisition Bill)
राहुल गांधी हे केरळ येथील वायनाड मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. वास्वत हे आहे की देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांविषयीची माहिती नाही. या कायद्यातील तरतूदींची त्यांना माहिती नाही. त्यांना जर या कायद्याची माहिती झाली तर संपूर्ण देशात आंदोलन होईल. संपूर्ण देशाला आग लागेल, असं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी महात्मा गांधी यांचं एक वाक्य ट्विट करून कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. महात्मा गांधी म्हणाले होते, विनम्रपणे विरोध करून तुम्ही जग हादरवून सोडू शकता… माझी विनंती आहे की केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
उद्योगपती देश चालवत आहेत
देशातील आजची परिस्थिती तुम्ही जाणून आहात. केवळ 2-3 बड्या उद्योगपतींच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. आज प्रत्येक उद्योगावर 3-4 उद्योगपतींचा एकाधिकार आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ट्रॅक्टर रॅलीत काय घडलं?
मंगळवार 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. (Rahul Gandhi alleges PM Modi of ‘trying to kill’ Land Acquisition Bill)
VIDEO: Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 27 January 2021https://t.co/3oboAE50Qj#Headlines
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021
संबंधित बातम्या:
PM Kisan: लवकरच 1.6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये, अर्जात त्रुटी असेल तर काय कराल?
(Rahul Gandhi alleges PM Modi of ‘trying to kill’ Land Acquisition Bill)