‘खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात’, राहुल गांधी गरजले

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

'खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात', राहुल गांधी गरजले
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 5:32 PM

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. देशातील संकटाची स्थिती केवळ कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तयार झालेली नाही, तर केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे तयार झालीय, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय. तसेच देशाला तुमची रिकामी बडबड नकोय तर या प्रश्नांवर उपाययोजना हव्या आहेत, असंही मत व्यक्त केलं. काँग्रेसकडून देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारला आलेल्या अपयशावरुन सातत्याने टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे ट्विट केलंय (Rahul Gandhi criticize Narendra Modi and BJP Government on Corona crisis in India).

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “मी घरी क्वॉरंटाईन झालेलो आहे आणि सातत्याने दुखद बातम्या समजत आहेत. भारतात तयार झालेलं संकट हे कवेळ कोरोनामुळे आलेलं नाही, तर केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांमुळे आलेलं आहे. देशाला तुमचे खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, तर या प्रश्नांवर उपाययोजना हव्या आहेत.”

“देशात नागरिकांना कोरोना लस आणि ऑक्सिजनची गरज असताना देशाबाहेर निर्यात करणं गुन्ह्यापेक्षा कमी नाही”

“भारताकडे अद्यापही कोरोनाशी लढण्यासाठी रणनीती नाहीये. देशातील नागरिकांना कोरोना लस आणि ऑक्सिजनची गरज असताना त्याची देशाबाहेर निर्यात करणं हे गुन्ह्यापेक्षा कमी नाही. गरीब जनता ही केवळ संख्या नाहीये. ते जीवंत माणसं आहेत. असे शेकडो नाडलेले कुटुंबं आहेत. भाजपचं सरकार मध्यवर्गाला पायाखाली तुडवून गरीब वर्गात ढकलत आहे. या प्रकारे भाजप सरकारने विनाश करुन दाखवलाय.”

दरम्यान, राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाआधीच राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आपल्या सर्व सभा रद्द केल्या होत्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय नेत्यांनाही निवडणूक प्रचाराच्या सभा रद्द करण्याचं आवाहन केलं होतं.

मागील 24 तासात देशात 3.14 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा :

कोरोनाचा उद्रेक, सोनिया गांधी- ममता बॅनर्जींमध्ये चर्चा; पश्चिम बंगालच्या प्रचारातून काँग्रेसची पूर्णपणे माघार

Rahul Gandhi tests covid positive : राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

West Bengal Election 2021 : राहुल गांधी पाठोपाठ भाजपचाही मोठा निर्णय, फक्त 500 लोकांमध्ये होणार पंतप्रधान मोदींचा सभा!

व्हिडीओ पाहा :

Rahul Gandhi criticize Narendra Modi and BJP Government on Corona crisis in India

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.