भाजप, संघ माझे गुरू, कडाक्याच्या थंडीत टीशर्ट का घालता?; काही प्रश्न ज्यांची उत्तरे राहुल गांधी यांनी दिली एका वाक्यात

जेवढा ते हल्ला करतील तेवढं आम्हाला आमच्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. त्यांनी थोडा आक्रमकपणे हल्ला करावा असं मला वाटतं. त्यामुळे काँग्रेसला अधिकच फायदा होईल.

भाजप, संघ माझे गुरू, कडाक्याच्या थंडीत टीशर्ट का घालता?; काही प्रश्न ज्यांची उत्तरे राहुल गांधी यांनी दिली एका वाक्यात
भाजप, संघ माझे गुरू, कडाक्याच्या थंडीत टीशर्ट का घालता?; काही प्रश्न ज्यांची उत्तरे राहुल गांधी यांनी दिली एका वाक्यातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 8:47 AM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत राहुल गांधी हे टी शर्टमध्येच असलेले दिसले. कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी टी शर्ट घालून असल्याने त्याची अधिक चर्चा रंगली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे. अखेर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. माझ्या टी शर्टमुळे एवढा डिस्टर्ब का होतोय? मी स्वेटर घालावं असं तुम्हाला वाटतं का? मी स्वेटर घालत नाही. कारण मला थंडीची भीती वाटत नाही. मला थंडी वाटू लागेल तेव्हा मी स्वेटर घालेल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. देशात द्वेष, भीती आणि हिंसा वाढली आहे. त्याविरोधात भारत जोडो यात्रा आहे. भारत जोडो यात्रा ही देशाचा आवाज आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. तसेच त्यांनी आरएसएस आणि भाजप नेत्यांचे आभारही मानले.

हे सुद्धा वाचा

जेवढा ते हल्ला करतील तेवढं आम्हाला आमच्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. त्यांनी थोडा आक्रमकपणे हल्ला करावा असं मला वाटतं. त्यामुळे काँग्रेसला अधिकच फायदा होईल.

त्यामुळे मी संघ आणि भाजपला एकप्रकारे माझे गुरूच मानतो. एकप्रकारे ते आम्हाला मार्गच दाखवत आहेत. काय करावं आणि काय करू नये हेच ते सांगत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

या यात्रेनंतर काय होणार असं लोक मला विचारत आहेत. पुढे काय करणार याचं प्लानिंग करावं असं काही लोक मला सांगत आहेत. पण माझी यात्रा ही काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो आवाज ऐकण्याआधीच आम्ही काही केलं तर भारतातील आवाजाचा अपमान होईल, असं ते म्हणाले.

सुरक्षेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बुलेटप्रूफ कारमध्ये बसून मी यात्रा करू असं सरकारला वाटतं. मी भारत जोडो यात्रेवर आहे. सरकारला वाटतं मी बुलेटप्रूफ कारमध्ये बसून यात्रा करू. आता आम्हाला अधिक त्रास देऊ नका.

तुम्ही बुलेटप्रुफ कारमध्ये बसून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची यात्रा करा, असं त्यांना सांगायचं आहे. पण माझ्यासाठी ते शक्य नाही. मी भारत जोडो यात्रा बुलेटप्रूफ कारमध्ये बसून कशी करू? असा सवाल त्यांनी केला.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.