Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे पण हिंदू कार्ड, असा वार, असा पलटवार
Rahul Gandhi : इंडिया आघाडी हिंदू विरोधी असल्याचा दारुगोळा भाजपकडून सातत्याने डागण्यात येत होता. या आघाडीतील काही पक्षांनी हिंदुविरोधी विधानांचा धडाका लावल्याने इंडिया आघाडी कोंडीत सापडली होती. पण आता राहुल गांधी यांची समाज माध्यमांवरील 'सत्यम शिवम सुंदरम' ची पोस्ट का व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘सत्यम शिवम सुंदरम’ ही समाज माध्यमांवरील पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Uday Nidhi Stalin) यांनी सनातन धर्माविषयी अपशब्द काढले होते. त्यांनी या भूमिकेवर त्यांचा हेका कायम ठेवला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीवर भाजप आणि हिंदुत्वावादी संघटनांनी जोरदार तोंडसूख घेतले. इंडिया आघाडी कोडींत सापडली. भाजपने दारुगोळा डागणे कमी केल्यावर राहुल गांधी यांची हिंदू धर्माची (Hindu Religion) व्याख्या करणारी, हिंदूत्व म्हणजे काय याची उलगड करणारी पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. नेमकं काय म्हटलंय त्यांनी या पोस्टमध्ये…
काय आहे पोस्ट
राहुल गांधी यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या मथळ्याखाली मायक्रो ब्लॉगिंग साईट X (Twitter) वर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. दोन पानी हिंदी आणि इंग्रजीत भाषेतील त्यांचे हे मत त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यावर युझर्सच्या चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहे. ही पोस्ट लवकरच व्हायरल झाली आहे. ‘ एक हिंदू त्याच्या अस्तित्वाचे बदल उदारपणे करुणेने आणि सन्मानाने स्वीकारतो, कारण त्याला माहिती आहे की, या जीवनरुपी चक्रात, भवसागरात आपण बुडत आहोत. दुर्बलांचे रक्षण करणे हा त्याचा धर्म आहे.’ असा उदात व्याख्या त्यांनी केली आहे.
सत्यम् शिवम् सुंदरम्
एक हिंदू अपने अस्तित्व में समस्त चराचर को करुणा और गरिमा के साथ उदारतापूर्वक आत्मसात करता है, क्योंकि वह जानता है कि जीवनरूपी इस महासागर में हम सब डूब-उतर रहे हैं।
निर्बल की रक्षा का कर्तव्य ही उसका धर्म है। pic.twitter.com/al653Y5CVN
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 1, 2023
हिंदू विषयी काय लिहिले
हिंदूमध्ये त्याच्या भीतीकडे गंभीरतेने, सखोलतेने पाहण्याची आणि ते स्वीकारण करण्याचे धाडस असते. जीवनाच्या यात्रेत तो भयाला, शत्रूला मित्रात बदलण्याचे शिकतो. भीती त्याच्यावर कधीच अधिराज्य गाजवू शकत नाही. उलट ही भीतीच मित्र होऊन त्याला रास्ता दाखवते. भीतीने त्याचा राग अनावर होईल. तो हिंसक होईल, तो लागलीच तीव्र प्रतिक्रिया देईल, इतका हिंदू कमकुवत नसतो. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्ञान प्राप्तीसाठी हिंदूत्व कायम कुतूहल असते, त्यामुळेच त्याचे अंतःकरण सदैव खुले असते. तो विनम्र असतो, असे मत त्यांनी मांडले आहे.
ईश्वराकडे जाणारे विविध मार्ग
हिंदू सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करतो. हा भवसागरात तरण्यासाठी प्रत्येकाचे आपआपले मार्ग आणि साधना आहेत. प्रत्येकाला त्याच्या मार्गाने जाण्याचा अधिकार आहे. तो सर्वच मार्गावर प्रेम करतो. सर्वांचाच आदर करतो. त्यांची उपस्थितीत स्वीकार करतो.