राहुल गांधींचे आश्वासन ₹40000000000000 पडणार, देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम, पैसा येणार कसा?
सरकारचा सन 2022 मधील अर्थसंकल्प 39 लाख कोटींचा आहे. 2023 मध्ये 41.9 लाख कोटींचा बजेट राहिला. 2024-25 मध्ये 47.66 लाख कोटींचा अर्थसंकल्प असण्याचा अंदाज आहे. सरकारला कर आणि इतर उत्पन्नातून 30.80 लाख रुपये मिळतात.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आश्वासनांची खैरात मांडली आहे. त्यात राहुल गांधी यांनी केलेल्या एका आश्वासनामुळे चांगले चांगले अर्थशास्त्रज्ञ बुचकाळ्यात पडले आहे. राहुल गांधी यांनी त्या आश्वासनाची फक्त घोषणाच केली नाही तर ते आश्वासन काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात दिले आहे. यामुळे त्या योजनेसाठी लागणारा पैसा उभा कसा करणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजनेस लागणारा पैसा देशाच्या एकूण अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महालक्ष्मी योजनेमुळे देशातील गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये मिळणार आहे. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास हे आश्वासन कसे पूर्ण होणार? हा प्रश्न आहे.
देशात किती गरीब
देशातील गरीब महिलांना महालक्ष्मी योजनेतंर्गत वर्षाला एक लाख रुपये देण्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. नीती आयोगाच्या 2024 मधील आकडेवारीनुसार देशातील गरीबीची संख्या समोर आली आहे. मोदी सरकारने 9 वर्षांत 24.82 भारतीयांना गरीबीतून बाहेर काढले आहे. सन 2013-14 मध्ये देशात 29.17 टक्के गरीब लोक होते. 2022-23 मध्ये ही टक्केवारी 11.28 टक्क्यांवर आली. म्हणजेच देशातील गरीब असणाऱ्या अजूनही 16.24 कोटी आहे. एका परिवारात चार सदस्य म्हणजेच चार कोटी परिवार दारिद्र्य रेषेखाली आहे.
योजनेसाठी किती खर्च येणार
देशातील गरिबांची संख्या चार कोटी आहे. राहुल गांधी यांच्या आश्वासनानुसार या परिवारातील महिलांच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये टाकणार आहे. म्हणजे दरवर्षी त्यासाठी 40 लाख कोटी रुपये लागणार आहे. राहुल गांधी यांचे एक आश्वासन पूर्ण करण्यासाठी ही रक्कम लागणार आहे. त्याचा फायदा देशातील फक्त 11 टक्के लोकांना मिळणार आहे.
सरकारचा सन 2022 मधील अर्थसंकल्प 39 लाख कोटींचा आहे. 2023 मध्ये 41.9 लाख कोटींचा बजेट राहिला. 2024-25 मध्ये 47.66 लाख कोटींचा अर्थसंकल्प असण्याचा अंदाज आहे. सरकारला कर आणि इतर उत्पन्नातून 30.80 लाख रुपये मिळतात. ही आकडेवारी पाहिल्यास राहुल गांधी यांची योजना पूर्ण कशी होणार? असा प्रश्न देशातील अर्थतज्ज्ञांना पडला आहे. राहुल गांधी यांचा हा जुगाड देशाला चांगलाच महागात पडणार आहे.