काँग्रेसचा आता नितिश कुमारांना दे धक्का…; ‘या’ बैठकीला काँग्रेस जाणारच नाही….
विरोधी पक्षातील काही नेते या गोष्टीला मान्यता देत नाही.त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आमचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार यांच्यावर जबाबदारी टाकली होती की ज्यांना बोलावायचे आहे त्यांना बोलावले पाहिजे.
नवी दिल्ली : विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार मोर्चाबांधणी केली असतानाच विरोधकांमध्ये आता कुरघोड्या करण्यास सुरुवात झाली आहे. या बाबत नितीशकुमार यांच्या पुढाकाराने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नितीश यांनी 12 जून रोजी पाटण्यात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.मात्र या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी या सभेला उपस्थित राहणार नाहीत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी मात्र यावर बोलताना त्याला दुजोरा दिला आहे.
बिहार प्रदेश काँग्रेस कार्यालय सदकत आश्रमात शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत एकीकडे पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्यांची निवड झाली,
तर दुसरीकडे अखिलेश प्रसाद सिंह यांनी राहुल गांधी किंवा खर्गे दोघेही 12 जूनच्या एकता बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
बिहार काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सांगितले की, राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असून त्यांचा 12 जूनपर्यंत देशात परतण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्याशी आधीच चर्चा केली होती.
तर दुसरीकडे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहभागाच्या प्रश्नावर त्यांनी बोलताना सांगितले की, आमच्या पक्षाच्यावतीने 12 जून रोजी होणाऱ्या बैठकीला केवळ मुख्यमंत्री आणि एका मोठ्या राज्याचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
गेल्या महिन्यात काँग्रेसने विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी 29 मे रोजी सांगितले होते की, नितीश कुमार यांनी त्यांना पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते, आणि त्याला काँग्रेसने त्याचा स्वीकार केला आहे.
अधीर रंजन यांनी बोलताना स्पष्टच सांगितले होते की, विरोधक एकत्र आले की, पंतप्रधान मोदींना निवडणुकीत पराभूत करण्याची संधी मिळणार असं विरोधी पक्षाकडून सांगण्यात येते.
पण विरोधी पक्षातील काही नेते या गोष्टीला मान्यता देत नाही.त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आमचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार यांच्यावर जबाबदारी टाकली होती की ज्यांना बोलावायचे आहे त्यांना बोलावले पाहिजे.