कोरोनाला रोखण्याठी केवळ लॉकडाऊन उपाय नाही, टेस्टिंग वाढवा : राहुल गांधी
"लॉकडाऊनमुळे कोरोना नष्ट होणार नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना थांबला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढेल", असं राहुल गांधी म्हणाले (Rahul Gandhi on corona).
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे (Rahul Gandhi on corona). मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हाच एक उपाय नसून कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरात टेस्टिंगही वाढवायला हव्यात, असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडलं. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला काही सूचना दिल्या (Rahul Gandhi on corona).
“लॉकडाऊनमुळे कोरोना नष्ट होणार नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना थांबला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढेल. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजन केल्या गेल्या पाहिजेत. यासाठी टेस्टिंग वाढवायला हव्यात आणि अनेक वैद्यकीय सुविधाही वाढवायला हव्यात जेणेकरुन कोरोनावर मात करता येईल”, असं राहुल गांधी म्हणाले.
“कोरोनाविरोधात खरी लढाई राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन लढत आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला मदत करायला हवी. केरळच्या वायनाडमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. संपूर्ण केरळमध्ये कोरोनाविरोधात एक विशिष्ट रणनिती आखली गेली होती. त्याचे परिणाम आता बघायला मिळत आहेत”, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
“देशात ज्या लोकांना पैशांची गरज आहे त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचू शकत नाही. लोकांवर अन्नधान्याचं मोठं संकंट आहे. अनेकांकडे रेशन कार्ड नाही. अशा लोकांनाही रेशन मिळायला हवं. प्रत्येक महिन्यात गरिबांना गहू, तांदूळ, दाळ आणि साखर मिळायला हवी”, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला.
“कोरोनाचा पराभव करण्यासाठी आर्थिक आणि वैद्यकीय या दोन्ही पातळींवर आपल्याला काम करावं लागेल. मोदी सरकारने केरळच्या वायनाड मॉडेल देशभरात लागू करावं”, असादेखील सल्ला राहुल गांधी यांनी दिला.
“लॉकडाऊनमुळे गरिबांसमोर अन्नधान्याचा प्रश्न उभा राहणार आहे. अशावेळी त्यांच्यापर्यंत धान्य पोहोचणं जरुरीचं आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. यावर उपाययोजना केली पाहिजे. लघू-उद्योगांच्या काही योजना सुरु व्हायला हव्यात. याशिवाय मोठमोठ्या कंपन्यांनादेखील मदत केली पाहिजे”, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला.
“देशात ज्या लोकांना पैशांची गरज आहे त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचू शकत नाही. लोकांवर अन्नधान्याचं मोठं संकंट आहे. अनेकांकडे रेशन कार्ड नाही. अशा लोकांनाही रेशन मिळायला हवं. प्रत्येक महिन्यात गरिबांना दहा किलो गहू, तांदूळ, दाळ आणि एक किलो साखर मिळायला हवी”, अशा सूचना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिल्या.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण
Corona : औरंगाबादेत एका गर्भवती महिलेसह तिघांना करोना, आकडा 28 वर
टीव्ही 9 इम्पॅक्ट : एपीएमसी मार्केट कामगार, व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट घ्या, एकनाथ शिंदेंचे आदेश