महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही : राहुल गांधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज (26 मे) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली (Rahul Gandhi on Maharashtra Government).

महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही : राहुल गांधी
Follow us
| Updated on: May 26, 2020 | 4:02 PM

नवी दिल्ली : “महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे (Rahul Gandhi on Maharashtra Government). मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे”, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज (26 मे) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Rahul Gandhi on Maharashtra Government).

“दाटीवाटीच्या परिसरत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. दिल्ली, मुंबई, पुणे या भागात दाटीवाटीची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, महाराष्ट्रात आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून योग्य मदत मिळायला हवी”, असं मत राहुल गांधी यांनी मांडलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं 21 दिवसांमध्ये किरोनाविरोधातील लढाई जिंकली जाऊ शकते. मात्र, आता जवळपास 60 दिवस होत आले. देशात कोरोना वाढत चालला आहे. आम्ही आदराने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारु इच्छितो की, तुमचा बी प्लॅन काय आहे?”, असं राहुल गांधी म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगांवं की, त्यांची पुढची रणनीती काय आहे? राज्य सरकार आता एकटे पडत चालली आहेत. काँग्रेसशासित राज्यांमधील शेतकऱ्यांना मदत म्हणून पैसे दिले जात आहेत. मात्र, केंद्राकडून कोणतीही मदत मिळत नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

“काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांकडे योग्य रणनीती आहे. आम्ही गरिबांना पैसे आणि जेवण देत आहोत. प्रवाशांनादेखील मदत करत आहोत. वैद्यकीय चाचण्या वाढवत आहोत. मात्र, केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळाल्याशिवाय राज्य सरकारची रणनीती पूर्ण होऊ शकत नाही. मला आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ते एकटी लढाई लढत आहेत. पुढे नियोजन कसं करायचं याची जाणीव त्यांना आहे. मात्र, केंद्र सरकारने संकटाशी सामना करण्यासाठी कोणती योजना आखली आहे?”, असा सवाल राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला.

संबंधित बातम्या :

नारायण राणे अस्वस्थ, तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात

“नारायण राणेंचं शिवसेनेशी जुनं नातं, सेनेनं त्यांना मोठं केलं आणि सेनेनंच रस्त्यावर आणलं”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.