चर्चा नकोच, काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे; राहुल गांधी कडाडले

कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. (rahul gandhi)

चर्चा नकोच, काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे; राहुल गांधी कडाडले
rahul gandhi
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 3:42 PM

नवी दिल्ली: कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जंतरमंतरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. चर्चा हवीच कशाला? काळा कृषी कायदाच रद्द केला पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्या न्याय आहेत. त्यामुळेच आम्ही जंतरमंतरवर आलो आहोत. विरोधी पक्षाचे सर्वच नेते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत, असं सांगतानाच केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. आता चर्चेतून काही निष्पन्न होणार नाही, असं राहुल यांनी सांगितलं.

पेगाससवर चर्चा होत नाही

संसदेत काय होत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आम्हाला संसदेत पेगाससवर चर्चा घडवून आणायची आहे. पण चर्चा केली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या फोनमध्ये पेगासस भरलेलं आहे, असं ते म्हणाले.

खासदारांची नारेबाजी

जंतरमंतरवर आलेल्या या खासदारांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी या खासदारांनी शेतकरी वाचवा, देश वाचवाचे नारेही दिले. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.

आप, तृणमूलची दांडी

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वच विरोधी पक्ष एकवटले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदारही यावेळी उपस्थित होते. मात्र ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल, मायावतींच्या बसपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी दांडी मारली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

संबंधित बातम्या:

पवार बंगळुरुत पोहोचले आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला, पुढे नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

‘राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र आणि हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही’, काँग्रेसचा हल्लाबोल

राज ठाकरेंच्या दारातून चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना खुलं आव्हान!

(Rahul Gandhi, Other Leaders Join Farmers Protest At Delhi’s Jantar Mantar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.