मोदी-शाहा यांच्यावर टिप्पणी केल्याप्रकरणी जेलमध्ये गेलेल्या पादरींना राहुल गांधींनी विचारला प्रश्न, येशू ख्रिस्तांच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने नवा वाद
याच जॉर्ज पोन्नैय्या यांना मागे अटकही करण्यात आली होती. जमिनीवर अनवाणी यात्रा करणाऱ्यांवर जॉर्ज यांनी टीका केली होती. ख्रिश्चन पायात बूट घालतात त्याचे कारण पायांना नंतर त्रास होऊन नये, असे वक्तव्य केले होते. भारत मातेबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जॉर्ज यांना घरती माता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्याविरोधात अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra)काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी पादरी जॉर्ज पोन्नैय्या यांची घेतलेली भेट वादात सापडली आहे. भाजपाचे (BJP)प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी या भेटीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत पादरी जॉर्ज पोनैय्या यांनी येशू हाच एकमेव देव असल्याचे सांगितले आहे. इतर शक्ती किंवा देवतांच्या तुलनेत येशू हेच देव असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावरुन जॉर्ज पोन्नैय्या हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
George Ponnaiah who met Rahul Gandhi says “Jesus is the only God unlike Shakti (& other Gods) “
हे सुद्धा वाचाThis man was arrested for his Hindu hatred earlier – he also said “I wear shoes because impurities of Bharat Mata should not contaminate us.”
Bharat Jodo with Bharat Todo icons? pic.twitter.com/QECJr9ibwb
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) September 10, 2022
यापूर्वी वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी अटक
याच जॉर्ज पोन्नैय्या यांना मागे अटकही करण्यात आली होती. जमिनीवर अनवाणी यात्रा करणाऱ्यांवर जॉर्ज यांनी टीका केली होती. ख्रिश्चन पायात बूट घालतात त्याचे कारण पायांना नंतर त्रास होऊन नये, असे वक्तव्य केले होते. भारत मातेबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जॉर्ज यांना घरती माता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्याविरोधात अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर मद्रास हायकोर्टाने जॉर्ज यांना या प्रकरणी फटकारले होते.
It’s Rahul Gandhi’s Nafrat Jodo Abhiyan. Today they’ve made a person like George Ponnaiah the poster boy of Bharat Jodo Yatra who challenged, threatened Hindus & said inappropriate things about Bharat Mata. Congress has a long history of being anti-Hindu: Shehzad Poonawalla, BJP pic.twitter.com/HMtdnY8MiR
— ANI (@ANI) September 10, 2022
मद्रास हायकोर्टानेही फटकारले होते
अटक करण्याला विरोध करण्याच्या याचिकेवर मद्रास हायकोर्टाने चांगलेच फटकारले होते. दुसऱ्या धर्मांच्या धार्मिक मान्यतांचा कुणीही अपमान करु शकत नाही, असे कोर्ट म्हणाले होते. हिंदूंच्या धार्मिक मान्यतांना दुखावण्याची काहीही गरज नव्हती, असे वक्तव्य कोर्टाने केले होते. पूर्ण भाषण वाचल्यानंतर जॉर्ज यांच्या निशाण्यावर हिंदू समुदाय आहे, हे स्पष्ट होत असल्याचे मतही कोर्टाने व्यक्त केले होते. हिंदू एका बाजूला आणि मुस्लीम आणि खअरिश्चन हे एका बाजूला ठेवण्याचा जॉर्ज यांचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. एका धार्मिक समुदायाला, दुसऱ्या धर्माविरोधात उभे करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही करण्यात आली होती.