मोदींच्या ‘असत्याग्रहा’वर बळीराजांचा विश्वास नाही; ‘त्या’ बैठकीपूर्वीच राहुल गांधींचं ट्विट
शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. (Rahul Gandhi Taunts PM Narendra Modi Over farmer issue)
नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. आज शेतकरी आणि केंद्र सरकार दरम्यान पुन्हा चर्चा होणार असून या चर्चेपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. मोदी सरकारचे असत्याचे प्रयोग सुरूच असून शेतकरी त्यावर विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. (Rahul Gandhi Taunts PM Narendra Modi Over farmer issue)
केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा म्हणून शेतकऱ्यांनी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान सहा वेळा बैठका झाला. या सहाही बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे आज सातव्यांदा बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मोदी सरकारचे आश्वासने कशी पोकळ निघालीत याची पोलखोल केली आहे. तसेच शेतकऱ्यांना एकप्रकारे मोदींच्या या असत्याच्या प्रयोगाला न भुलण्याचं आवाहनही केलं आहे.
मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचंही आश्वासन दिलं होतं. त्यासाठी मला 50 दिवस द्या असं ते म्हणाले होते. कोरोना आला तेव्हा आम्ही 21 दिवसात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू असं ते म्हणाले होते. आमच्या भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही, असंही ते म्हणाले होते. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला होता. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यातून काही मार्ग निघणार नाही का? सर्वजण आत्महत्येच्याच मार्गाने जाणार आहेत का? त्यामुळे राजकीय पक्षांनाही याबाबतचा विचार करावा लागेल. आता केंद्राने 30 तारखेला शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. ठिक आहे. 30 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यातून तोडगा निघाला नाही तर आम्हाला बसावं लागेल. विरोधी पक्षांना त्याचा विचार करावा लागेल, असा इशारा पवारांनी दिला होता. मला वाटतं सरकारने हे आंदोलन गंभीरपणे घेतलं पाहिजे. चर्चा करून तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच या आंदोलना दरम्यान पाच शेतकऱ्यांचा मृत्यूही झाल्याचं मी ऐकलं आहे. अशी परिस्थिती असेल तर देशासाठी ते योग्य नाही, असंही ते म्हणाले होते. (Rahul Gandhi Taunts PM Narendra Modi Over farmer issue)
“15 lakh in every bank account & 2 crore jobs every year”
“Give me 50 days time, else…”
“We will win war against Corona in 21 days”
“Neither has anyone intruded into our territory nor took over any post”
Farmers don’t trust Modi ji due to his long history of ‘asatyagraha’.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 30, 2020
संबंधित बातम्या:
शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर…
शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ
New COVID Strain | कोरोनाच्या नव्या अवताराची डोकेदुखी, यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण
(Rahul Gandhi Taunts PM Narendra Modi Over farmer issue)