भारत जोडो इफेक्ट; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट म्हणतात, हम सब एकसाथ…
आता या क्षणी आपापल्यामध्ये वाद घालण्यात काही अर्थ नाही, कारण आता खरी गरज आहे ती राहुल गांधींना बळ देण्याची.
नवी दिल्लीः काँग्रेसची आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा आता काही दिवसांनी राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे राजस्थानमधील राजकारणात आता बदलाचे वारे फिरू लागले आहे. राहुल गांधी आता राजस्थानमध्ये दाखल होण्याआधीच अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी आपल्यात वाद संपवण्याचे संकेत दिले आहेत.
या राजकीय वातावरणाच्या बदलात गेहलोत आणि पायलट आज माध्यमांसमोर येत त्यांनी राहुल गांधीच आपली खरी संपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्हा दोघा नेत्यांची खरी संपत्ती ही राहुल गांधीच आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये आता वाद राहिलाच नाही असंही दोघांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भारत जोडो यात्रा आणि राहु गांधी राजस्थानमध्ये पोहचण्यापूर्वीच के. सी. वेणुगोपाल यांच्यावर दोन्ही नेत्यांमधील वाद मिठवण्याची जबाबदारी काँग्रेसनी त्यांच्यावर सोपावली होती.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सगळ्यासमोर आला होता. त्यावेळी राजकीय वाद उफाळून आला होता.
त्यामुळे राहुल गांधी राजस्थानमध्ये पोहचण्यापूर्वीच माध्यमांसमोर या दोघांनी एकत्र येत आपल्यातील राजकीय वाद संपला असल्याचे चित्र तर उभा केले आहे.
माध्यमांसमोर येत या दोघांनी आपल्यासाठी राहुल गांधी सर्वस्व आहेत. आणि आमच्या दोघांची खरी राजकीय संपत्ती ही राहुल गांधीच असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केल्यावर या दोघांनीही हा विषय इथेच संपला असल्याचे स्पष्ट केले होते.
यावेळी काँग्रेसविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस या पक्षाचा सर्वात मोठा गुण काय आहे तर हा पक्ष स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा राजकीय पक्ष म्हणून एक नंबरचा आहे. आणि हा पक्ष एका नेत्याच्या शिस्तीत चालत असल्याचेही गेहलोत यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना गद्दार म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सचिन पायलट गेहलोत यांना म्हणाले की, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते आम्हाला काहीही म्हणू शकतात.
नालायक आणि देशद्रोहीही ते म्हणू शकतात. मात्र आता यावेळी यागोष्टीवर बोलण्याची ही वेळ नाही. कारण भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात लढा देण्याची वेळ असून राहुल गांधींना बळ देण्याचे महत्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.