चीनला प्रत्युत्तर द्यावे लागेल, मोदीजी मौन सोडा, पुन्हा राहुल गांधी कडाडले
गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच चांगला दिसतो. चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल. मोदी जी, मौन सोडा. असे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले आहे.
नवी दिल्ली : चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात नवीन वर्षाच्या शुभेच्छा ज्यांना दिल्या, ते नागरीक चिनी असल्याचा दावा करत ग्लोबल टाईम्य या चीनमधील माध्यमानं एक बातमी दिली. त्याचा हवाला देत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधलाय. गलवान खोऱ्यात तिरंगा शोभून दिसतो असे म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून पुन्हा ट्विट केले आहे. त्यामुळे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
चीनला प्रत्युत्तर द्यावे लागेल
अशाच एका दुसऱ्या व्हिडिओचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदींना उद्देशून एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच चांगला दिसतो. चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल. मोदी जी, मौन सोडा. असे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले आहे. शुक्रवारीच राहुल गांधींनी अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांची नावे चिनी ठेवल्याचे वृत्त शेअर केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते, काही दिवसांपूर्वीच आपण 1971 मधील गौरपूर्ण विजयाची 5 दशके साजरी करत होतो. देशाची सुरक्षा आणि विजयासाठी कठोर निर्णयांची गरज असते, खोट्या जुमल्यांनी विजय मिळत नसतो. असा टोला त्यांनी मोदींना लावला होता.
गलवान पर हमारा तिरंगा ही अच्छा लगता है।
चीन को जवाब देना होगा। मोदी जी, चुप्पी तोड़ो!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 2, 2022
चिनी सैनिकांनी आणि भारतीय सैनिकांनी नववर्षाला एकमेकांना मिठाई दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील तणाव वाढला आहे. तो तणाव विसरून अनेक ठिकाणी एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसासार जिथे मिठाई दिली गेली त्यात पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि डेमचोक आणि उत्तर सिक्कीममध्ये नाथुला आणि कोगराचाही समावेश आहे.