Current Ticket: ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी मिळू शकते कन्फर्म तिकीट, अनेकांना माहीत नाही ही आयडिया

Indian Railway Current Ticket Rules: तत्काल तिकिटासाठी नेहमीच्या तिकीटापेक्षा जास्त पैसे भरावे लागतात. परंतु करंट तिकिटासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही. नेहमीच्या तिकीट दरात हे तिकीट मिळते. हे तिकीट तुम्ही रेल्वेच्या काऊंटवर जाऊन देखील तयार करु शकता.

Current Ticket: ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी मिळू शकते कन्फर्म तिकीट, अनेकांना माहीत नाही ही आयडिया
current ticket
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 2:00 PM

Indian Railway Current Ticket Rules: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सुखकारक आणि स्वस्त असल्यामुळे अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे अनेक वेळा कठीण असतात. ऐनवेळी प्रवासाला जावे लागत असताना तत्काल तिकीट एक पर्याय असतो. परंतु तत्काल तिकीटही एक मिनिटांत बुक होतात. त्यानंतर आरक्षित तिकीट मिळवण्याचा काही मार्ग नसतो, असे अनेकांना वाटते. परंतु आरक्षित तिकीट मिळवण्याचा आणखी एक मार्ग त्यानंतर असतो. ट्रेन सुटण्याचा काही तासांपूर्वी आणि चार्ट लागल्यानंतर आरक्षित तिकीट मिळू शकते.

करंट तिकीट बुकींग

भारतीय रेल्वे प्रवाशांचा अनेक प्रकारचे सुविधा देते. अनेक प्रवाश्यांना अचानक जावे लागत असल्यामुळे तिकीट मिळत नाही. रेल्वे अशा प्रवाशांना करंट तिकीट बुकींगची सुविधा दिली आहे. सध्याच्या तिकीट सुविधेअंतर्गत ट्रेनमध्ये ज्या जागा रिक्त राहतात, त्यासाठी ही सुविधा दिली आहे. ही तिकिटे रेल्वे स्थानकातून गाड निघण्यापूर्वी चार्ट तयार झाल्यावर दिली जाते. रेल्वेच्या या सुविधेमुळे रेल्वेच्या महसुलातही वाढ होते. तसेच प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निश्चित सीट मिळते.

असा मिळावे करंट तिकीट

हे सुद्धा वाचा
  • IRCTC ॲप किंवा वेबसाईटवरवर तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • मुख्यपृष्ठावरील ट्रेन विभागात जा आणि ‘Chart Vacancy’ वर क्लिक करा.
  • यानंतर ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि स्टेशनचे नाव टाका.
  • ‘गेट ट्रेन चार्ट’वर क्लिक करा.
  • आता फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, थर्ड इकॉनॉमी आणि स्लीपर क्लासमधील तुमच्या आवडत्या क्लासवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर त्या क्लासची रिक्त जागा दिसेल.

टीटीईकडून सीट करता येईल बुक

  • रिकामी जागा शोधल्यानंतर, ताबडतोब ट्रेनच्या टीटीईशी (चल तिकीट परीक्षक) संपर्क साधा.
  • टीटीईला रिक्त जागांची माहिती द्या.
  • आवश्यक भाडे भरून सीट तुमच्या नावावर बुक करा.
  • TTE तुम्हाला मॅन्युअल तिकीट तयार करेल, ज्याद्वारे तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करू शकता.

विशेष म्हणजे तत्काल तिकिटासाठी नेहमीच्या तिकीटापेक्षा जास्त पैसे भरावे लागतात. परंतु करंट तिकिटासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही. नेहमीच्या तिकीट दरात हे तिकीट मिळते. हे तिकीट तुम्ही रेल्वेच्या काऊंटवर जाऊन देखील तयार करु शकता.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.