Twitter चा देशी पर्याय Koo! रेल्वेमंत्र्यांनी केलं प्रमोट, काय आहे खास?

पियूष गोयल यांनी मंगळवारी ट्विटरचा स्वदेशी पर्याय Koo मध्ये सहभागी होण्याबाबत ट्वीट केलं आहे. भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपला घेऊन सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

Twitter चा देशी पर्याय Koo! रेल्वेमंत्र्यांनी केलं प्रमोट, काय आहे खास?
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 10:38 PM

मुंबई : रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी ट्विटरचा स्वदेशी पर्याय Koo मध्ये सहभागी होण्याबाबत ट्वीट केलं आहे. भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपला घेऊन सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉन्च झालेला Koo भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे मायक्रोब्लॉगिंगचा अनुभव देतं.(Piyush Goyal promotes Koo app as an alternative to Twitter)

त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, काही सरकारी विभागांनी स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट Kooवर आपलं खातं सुरु केलं आहे. काही ट्वीट आणि खात्यांवर निर्बंध लादण्याच्या सरकारचे आदेश ट्विटरकडून पाळण्यात आला नाही. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. Koo ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर (NIC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या हँडल सुरु करण्यात आले आहे.

Koo ने सांगितलं की, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या काही प्रमुख संघटनांनी भारताचे स्वदेशी मायक्रोब्लॉगिंस साईट Kooवर आपले खाते उघडले आहे. हे पाऊल म्हणजे ट्विटरविरोधातील एक प्रतिक्रिया आहे. ट्विटरने 257 ट्वीट आणि ट्विटर खात्यांवर निर्बंध लादण्याचा सरकारच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्या ट्विटर खात्यावरुन हिंसाचाराबाबत काही ट्वीट करण्यात आले होते.

Koo मध्ये काय खास?

भारतीय संदर्भाने Koo एक व्हॅल्यूएबल आणि पॉवरफूल प्लॅटफॉर्म आहे. हे App 10 महिन्यांपूर्वीच सुरु झालं आहे. या App ने गेल्या वर्षी सरकारचं आत्मनिर्भर चॅलेंज जिंकलं होतं. याचा उद्देश स्थानिक App विकास करणं हा होता. ट्विटरप्रमाणेच Koo युजर्सना लोकांना फॉलो करण्याची परवानगी देतं. हे App युजर्सना मॅसेज लिहिणं, तसंच ऑडिओ, व्हिडीओ फॉरमॅटमध्ये एकमेकांना पाठवण्याची परवानगी देतं. Koo वर भारतीय भाषांमध्ये विचार व्यक्त करण्याची सोय आहे.

हे ही वाचा :

गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा

भारतात आता मेड इन इंडिया Appsचा बोलबाला, चिनी कंपन्यांची सद्दी संपली

Piyush Goyal promotes Koo app as an alternative to Twitter

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.