RAC प्रवाशांसाठी चांगली बातमी, भारतीय रेल्वेने उचलले हे पाऊल

RAC Ticket: रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जातात. परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नाही. यासंदर्भात बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, आरएसी तिकीट धारकांना कन्फर्म तिकीट धारकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येणार आहे.

RAC प्रवाशांसाठी चांगली बातमी, भारतीय रेल्वेने उचलले हे पाऊल
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 3:24 PM

RAC Ticket: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवाशी प्रवास करत असतात. तिकीट आरक्षित करुन प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही जणांचे तिकीट वेटींगवर असतात तर काहींना आरएसी तिकीट मिळते. आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे. रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना देण्यात न येणारी सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या एसी कोचमध्ये आरएसी तिकीट असणाऱ्यांना बेडरोल, बेडशीट, ब्लँकेंट आणि उशी दिली जात नव्हती. आता हे सर्व सामान आरएसी धारकांना मिळणार आहे.

आता भेदभाव संपणार

आरएसी (Reservation Against Cancellation) तिकीट असणाऱ्यांना साइड लोअर बर्थवर अर्ध्या सिटीवर प्रवास करावा लागतो. साइड लोअरच्या खालच्या सीटवर दोन जण मिळून प्रवास करतात. आता या प्रवाश्यांना कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे बेडरोल आणि इतर सुविधा मिळणार आहे. कोच अटेंडेंट बर्थवर पोहचल्यावर प्रवाश्यांना बेडरोल देणार आहे. यामुळे कन्फर्म तिकीट धारक आणि आरएसी तिकीट धारक यांच्यातील भेदभाव संपणार आहे.

हे सुद्धा वाचा

रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जातात. परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नाही. यासंदर्भात बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, आरएसी तिकीट धारकांना कन्फर्म तिकीट धारकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येणार आहे. रेल्वेने आरक्षित शयनयान श्रेणीत वेटींग तिकीट असणाऱ्यांना प्रवाशांना बंदी केली आहे. कोणत्याही प्रकारच्या वेटींग तिकिटावर रेल्वेच्या आरक्षित कोचमधून प्रवास करत येत नाही.

आता या सुविधा मिळणार

  • आता आरएसी तिकीटावर प्रवास करणाऱ्या दोन्ही प्रवाशांना वेगवेगळे बेड रोल, ब्लॅकेट, उशी दिली जाईल. त्यामुळे भेदभावचा आरोप संपणार आहे.
  • एसी कोचमध्ये थंडीपासून वाचण्यासाठी पॅकेटमध्ये असणारे सर्व सामान मिळणार आहे. त्यात बेडशीट, पिलो, ब्लॅकेटचा समावेश आहे.
  • आरएसी तिकीट आणि कन्फर्म तिकीट धारकांमध्ये कोणताही भेदभाव असणार नाही. सर्व भेदभाव संपणार आहे.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.