AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाणं आता सोप्पं, जाणून घ्या मोदींनी उद्घाटन केलेल्या 8 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक

देशातील विविध राज्यांना गुजरातला जोडणाऱ्या रेल्वेंचा आजपासून (17 रविवार) शुभारंभ झाला. या रेल्वेसेवांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (Gujarat Railway Narendra Modi)

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाणं आता सोप्पं, जाणून घ्या मोदींनी उद्घाटन केलेल्या 8 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला देशातील इतर भागाला जोडणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांचे उद्घाटन केले.
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 2:09 PM

मुंबई : देशातील विविध राज्यांना गुजरातला जोडणाऱ्या रेल्वेंचा आजपासून (17 रविवार) शुभारंभ झाला. या रेल्वेसेवांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले. देशातील विविध 8 भागांमधून गुजरातच्या केवडीया रेल्वेस्थानकाला जोडण्यासाठी या विशेष रेल्वेसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेसेवांना हिरवा झेंडा दाखवला. मुंबईच्या दादरहूनदेखील केवडीयासाठी एक विशेष रेल्वेगाडी आजपासून धावणार आहे. या गाडीला नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. (Railways connecting various states of the country to Gujarat inaugurated Prime Minister Narendra Modi)

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यंतची वाहतूक सुलभ

नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या विविध 8 रेल्वेगाड्यांमुळे देशातील वेगवेगळे भाग गुजरातशी जोडले जाणार आहेत. या रेल्वेगाड्यांमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंतची वाहतूक सुरळीत होणार आहे. याविषयी बोलताना  ‘ज्या व्यक्तीने (सरदार पटेल) देशाला जोडण्याचे काम केले, त्या व्यक्तीच्या प्रतिमेला देशातील वेगवेगळ्या आठ भागांना जोडले जात आहे,” असे  नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच हा क्षण माझ्यासाठी सुखद असल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.

या विशेष रेल्वेंचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याचं सांगितलं. तसेच “या रेल्वे कनेक्टिव्हीटीमुळे देशभरातून स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना फायदा होणार आहे. तसेच पर्यटनाच्या संधी वाढल्यामुळे केवडीया या भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनमात बदल होतील,” असे मोदी म्हणाले.

कोणत्या आठ रेल्वेंचे उद्घाटन, वेळापत्रक काय?

रेल्वेचा नंबर कोठून कुठपर्यंत रेल्वेगाडीचे नावकधी धावणार
09103/04केवड़िया वाराणसीमहामना एक्‍सप्रेस साप्‍ताहिक
02927/28 दादरकेवड़ियादादर-केवडिया एक्‍स्प्रेस रोज
09247/48 अहमदाबाद केवड़िया जन शताब्‍दी एक्‍स्प्रेसरोज
09145/46 केवड़ियाहजरत निजामुद्दीन निजामुद्दीन-केवडिया संपर्क क्रांति एक्‍स्प्रेसआठवड्यातून दोन दिवस
09105/06 केवड़ियारिवा केवडिया–‍रीवा एक्‍स्प्रेसआठवड्यातून एक दिवस
09119/20 चेन्‍नईकेवड़ियाचेन्‍नई-केवडियाएक्‍स्प्रेसआठवड्यातून एक दिवस
09107/08 प्रताप नगर केवड़िया एमईएमयू ट्रेनआठवड्यातून दोन दिवस
09109/10 केवड़ियाप्रतापनगरएमईएमयू ट्रेन आठवड्यातून दोन दिवस

संबंधित बातम्या :

नकली ओळखपत्राद्वारे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, 5 दलाल अटकेत, सव्वा लाखांची तिकिटे जप्त

Indian Railway: रेल्वे विभाग तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार, त्यासाठी ‘हे’ नियम वाचा

पुढच्या 5 दिवसांत रेल्वे प्रवाशांसाठी Good News, तिकिटांबाबत मोठी घोषणा

(Railways connecting various states of the country to Gujarat inaugurated Prime Minister Narendra Modi)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.