Indian Railway : यात्रीगण कृपया ध्यान दें ! मुंबई ते मध्य प्रदेश धावणार अमृत भारत ट्रेन, पाहा सर्व डिटेल्स
पहिल्याच दिवशी ही ट्रेन लेट झाली आहे. ही ट्रेन तीन तास उशीराने १० वाजता जबलपूरला पोहचली. २५ मिनिटांच्या थांब्यानंतर ट्रेन १०.२५ वाजता जबलपूरहून पुढे रवाना झाली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागला आहे.

Amrit Bharat Train : मुंबई ते मध्य प्रदेश प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने मोठी भेट दिली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळत टर्मिनस ते सहरसा दरम्यान देशातील तिसरी अमृत भारत ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सहरसा – मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. परंतू पहिल्याच दिवशी ही ट्रेन लेट झाली आहे. ही ट्रेन तीन तास उशीराने १० वाजता जबलपूरला पोहचली. २५ मिनिटांच्या थांब्यानंतर ट्रेन १०.२५ वाजता जबलपूरहून पुढे रवाना झाली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागला आहे.
2 मे पासून नियमित धावणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २ मे पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळत टर्मिनस ते सहरसा अमृत भारत ट्रेन धावणार आहे. लोकमान्य टिळत टर्मिनस ही ट्रेन दुपारी १२ वाजता सुटणार आहे रात्री ११.४५ वाजता इटारसी, दुसऱ्या दिवशी शनिवारी ३.१० वाजता जबलपुर, सकाळी ५.५० वाजता सतना आणि तिसऱ्या दिवशी रविवारी मध्यरात्री २ वाजता सहरसा पोहचणार आहे.
असे असणार वेळापत्रक
ट्रेन क्र. ११०१५ ही २ मे २०२५ पासून दर शुक्रवारी दुपारी १२:०० वाजता एलटीटी मुंबईहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी २:०० वाजता सहरसा येथे पोहोचेल.




ट्रेन क्र. ११०१६ ४ मे २०२५ पासून दर रविवारी ४:२० वाजता सहरसा येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १५:४५ वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.
ट्रेनचे साधेपणाने स्वागत
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्याने देशभर दुखवटा असल्यामुळे गाडीचे स्वागत अत्यंत थंडपणे झाले. मध्य प्रदेशातील जबलपुरात या गाडीच्या साधेपणाने स्वागत केले गेले. ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थांबली आणि २५ मिनिटांनंतर पुढील प्रवासासाठी निघून गेली. जबलपूर येथून ४ प्रवासी या गाडीत चढले.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर जंक्शन, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, सलौना आणि खगरिया जंक्शन.
डब्यांची रचना : ०८ स्लीपर क्लास, ११ जनरल सेकंड क्लास, एक पॅन्ट्री कार आणि ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन
आरक्षण : ट्रेन क्र. ११०१५ चे बुकिंग आजपासून सुरू करण्यात आले आहे.