पावसाने मोडला 80 वर्ष जुना रेकॉर्ड, रस्त्यावर दिसू लागल्या मगरी
चक्रीवादळ Michaung मुळे शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या रस्त्यावर मगर दिसली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर व्हायरल झाला आहे. चेन्नईमध्ये पावसाने ८० वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. अनेक भागात पाणी साचले आहे.
michaung cyclone : मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा दक्षिण भारताला बसत आहे. याचा परिणाम आता उत्तर भारतातही दिसून येत आहे. दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ मिचॉन्ग चेन्नईपासून पूर्व-ईशान्य 100 किलोमीटर अंतरावर आहे. ते उत्तरेकडे सरकत आहे. गेल्या 6 तासात हे चक्रीवादळ ताशी 10 किलोमीटर वेगाने पुढे सरकत होते. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे ५ डिसेंबर रोजी शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. चेन्नईत एवढा पाऊस पडला की, गाड्या पाण्यात तरंगताना दिसल्या. मगरी रस्त्यावर आल्या.
80 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
तामिळनाडूचे मंत्री केएन नेहरू म्हणतात की, गेल्या 80 वर्षांत चेन्नईमध्ये असा चक्रीवादळ पाऊस पडलेला नाही. मुसळधार पावसामुळे चेन्नईमध्ये वीज आणि पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. तामिळनाडूमध्ये बचावकार्य सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. तामिळनाडूतील बेसिन ब्रिज आणि व्यासरपाडी दरम्यानच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
म्यानमारने या चक्रीवादळाला हे नाव दिले आहे. 2023 मध्ये हिंदी महासागरातून उद्भवणारे हे सहावे वादळ आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की 5 डिसेंबर रोजी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. याशिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये वादळ आणि वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान खात्यानुसार, ओडिशामध्ये ५ डिसेंबरला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाऊस पडत आहे. या दोन्ही राज्यांतील सुमारे 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. ५ डिसेंबरलाही पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदलामुळे अनेक चक्रीवादळे येऊ लागली आहेत. अरबी समुद्राचे तापमान 1.4 अंशांनी वाढले आहे. या वर्षीचे सर्वात शक्तिशाली वादळ मोका होते.
चेन्नईच्या रस्त्यावर दिसली मगर
मुसळधार पावसामुळे चेन्नईमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मगर निवासी भागात फिरत असल्याचे दिसून येत आहे. चेन्नईच्या पेरुंगलाथूर भागात मगर दिसली. सोशल मीडियावर लोक म्हणताय की त्यांना अनेक भागात मासे, साप आणि मगरी दिसल्या आहेत.
சாலையை கடக்கும் முதலை.. அதிர்ச்சி வீடியோ#Chennai #ChennaiRains #Crocodile pic.twitter.com/2Z28KNjgJx
— A1 (@Rukmang30340218) December 4, 2023