Noru Cyclone | पुन्हा ढग दाटले, पुन्हा पाऊस, नोरू चक्रिवादळाचा परिणाम? वाचा कुठे कुठे यलो अलर्ट!

हवामान खात्याने महाराष्ट्रासह 20 राज्यांना यलो अर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट याचा अर्थ संबंधित राज्यांमध्ये मेघ गर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

Noru Cyclone | पुन्हा ढग दाटले, पुन्हा पाऊस, नोरू चक्रिवादळाचा परिणाम? वाचा कुठे कुठे यलो अलर्ट!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 5:03 PM

मुंबईः दसऱ्याच्या दिवशी (Vijaya Dashami) हलक्याशा पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आज राज्यभरात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे (Climate) आता सुरु झालेला पाऊस पुन्हा किती दिवस चालेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालाय. मात्र काही दिवसांपूर्वी फिलिपाइन्समध्ये निर्माण झालेल्या   नोरू चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याची माहिती समोर आली आहे.

नोरू चक्रीवादळामुळे (Noru Cyclone) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हे चक्राकार वारे वाहत असून आर्द्रता वाढल्याने पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये या वाऱ्यांचा परिणाम दिसून येतोय, अशी माहिती औरंगाबाद येथील हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

पुढील दोन दिवसात परतीच्या पावसाला सुरुवात होणार, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिली आहे. मात्र तत्पुर्वीच चक्रीवादळाचं सावट घोंगावत असल्याने हवामानात बदल झालाय.

स्कायमेटनुसार, आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

रबी पिकांना या पावसामुळे दिलासा मिळेल, अशी स्थिती आहे. तर भाजीपाला आणि फुलांवर थोडा विपरीत परिणाम होऊ शकतो.

हवामान खात्याने महाराष्ट्रासह 20 राज्यांना यलो अर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट याचा अर्थ संबंधित राज्यांमध्ये मेघ गर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

या 20 राज्यांत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, छ. गड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आदींचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमधील काही भागांना पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येथील काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.