Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : शाहनवाज हुसैन यांनी बृजभूषण सिंह यांना कोणता निरोप दिला?, अर्धा तासाच्या चर्चेत काय घडलं?; हुसैन म्हणतात…

सोमवारी केंद्रातील भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांना फोन करत होते. मात्र ते फोन घेत नाहीत, अशा चर्चाही रंगल्या. मात्र आज भाजपचे नेते शाहनवाज हुसैन हे बृजभूषण सिंह यांच्या भेटीला पोहोचल्याने या चर्चा आणखी बळावल्या. या भेटीनंतर हुसैन यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray : शाहनवाज हुसैन यांनी बृजभूषण सिंह यांना कोणता निरोप दिला?, अर्धा तासाच्या चर्चेत काय घडलं?; हुसैन म्हणतात...
शाहनवाज हुसैन यांनी बृजभूषण सिंह यांना कोणता निरोप दिला?, अर्धा तासाच्या चर्चेत काय घडलं?
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 3:58 PM

अयोध्या : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंचा (raj thackeray) अयोध्या दौरा (Ayodhya Visit) गाजत आहे. आता तर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा दिल्लीतही होऊ लागली आहे. कारण राज्यात राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन देणाऱ्या भाजपच्याच एक उत्तर प्रदेशातील नेत्याने राज ठाकरेंच्या या दौऱ्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांनी घेतली. आज त्यांनी अयोध्येत भव्य रॅली काढत या दौऱ्याला थेट आव्हान दिलंय. आजच्या रॅलीत त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शनही केलं आहे. मात्र भाजपकडून यांची मनधरणी सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यासाठी सोमवारी केंद्रातील भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांना फोन करत होते. मात्र ते फोन घेत नाहीत, अशा चर्चाही रंगल्या. मात्र आज भाजपचे नेते शाहनवाज हुसैन हे बृजभूषण सिंह यांच्या भेटीला पोहोचल्याने या चर्चा आणखी बळावल्या. या भेटीनंतर हुसैन यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शहनवाज हुसैन?

बृजभूषण सिंह यांच्या भेटीबाबत शाहनवाज हुसैन यांना विचारले असता ते म्हणाले, बृजभूषण सिंह माझे मित्र आहेत, मोठे भाऊ आहेत, मी माझ्या कामासाठी इकडे आलो होतो, त्यामुळे त्यांना भेटायला आलो आहे. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत मी तुमच्याकडूनच हे ऐकतोय, मला याविषयीची काहीच माहिती नाहीये. मला आताच या विषयाची माहिती मिळतेय, याबाबत मी बृजभूषण सिंह यांच्याशी बातचीत करणार आहे. मी बिहारहून थेट बृजभूषण सिंह यांना भेटायला आलोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे या भेटीनंतर तरी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध मावळणार की नाही? असा सवालही राजकारणात विचारण्यात येत आहे.

राज्यातूनही राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध

यूपीनंतर आता मुंबईतही उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरेंना विरोध केला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना, राज ठाकरेंनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच आपण अयोध्येला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. सुनील शुक्ला यांनी या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पत्र लिहून आपला निषेध व्यक्त केला असून, उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. उद्या राज ठाकरेंच्या घरी जाऊन उत्तर भारतीयांची माफी मागण्याचे निवेदन देणार असल्याचे पंडित सुनील शुक्ला यांनी सांगितले आहे, त्यामुळे आता या दौऱ्यावरून पुन्हा राजकारणात ठिणग्या उडू लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.