AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: भोंग्याचा मुद्दा यूपीपर्यंत पोहोचला? योगी म्हणतात, ‘धार्मिक परिसराच्या बाहेर आवाज जाता कामा नये’

Loud speakers at religious point: उत्तर प्रदेशात धार्मिक मिरवणुका, शोभायात्रा यांच्यावरही बंधनं घालण्यात आली आहे. शोभायात्रा, मिरवणुका काढण्यासाठी परवानगी शिवाय काढता येणार नाहीत.

Raj Thackeray: भोंग्याचा मुद्दा यूपीपर्यंत पोहोचला? योगी म्हणतात, 'धार्मिक परिसराच्या बाहेर आवाज जाता कामा नये'
उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णयImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 2:12 PM

एकीकडे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तिकडे उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) भोंग्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारनं धार्मिक उपासना करण्यात येणाऱ्या ठिकाणी माईकचा आवाज किंवा लाऊडस्पीकरचा आवाज हा त्या परिसरापुरता मर्यादित असावा, असं म्हटलंय. तसे आदेशही जारी करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) हा आदेश देताना महत्त्वपूर्ण टिप्पणीही केली आहे. आवाज त्या त्या ठिकाणची परिसराबाहेर येता कामा नये, असं म्हटलं आहे. प्रत्येक धर्माला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी माईक, स्पीकर यांचा वापरही करण्यास हरकत नाही. मात्र कुणाचाही अडथळा करुन जी गोष्टी केली जाते, त्याला प्रार्थना म्हणता येऊ शकत नाही, असंही सांगण्यात आलंय. त्याच प्रमाणेत नव्या आदेशानुसार नव्यानं माईक लावण्यासाठी परवनागी देऊ नये, असे आदेश यूपी सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.

राज ठाकरेंनी महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज ठाकरेंनी तीन मे पर्यंत मशिदींवर भोंग्यावर कारवाई करण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. अशातच उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडूनही महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आलेत.

शोभायात्रा, मिरवणुकांबाबत…

उत्तर प्रदेशात धार्मिक मिरवणुका, शोभायात्रा यांच्यावरही बंधनं घालण्यात आली आहे. शोभायात्रा, मिरवणुका काढण्यासाठी परवानगी शिवाय काढता येणार नाहीत. शोभायात्रा काढायची असेल, तर त्यासाठी शांती कायम राहिल, यासाठीची एक वचन आयोजकांकडून घेतलं जाईल.

त्यासाठी एक पत्रही आयोजकांकडून घेण्यात येईल. फक्त पारंपरिक आयोजकांना शोभायात्रेसाठी परवानगी देण्यात येईल. नव्या आयोजकांना गरज नसताना परवानही देऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.

पाहा – काय म्हणाले मुख्यमंत्री योगी?

यूपातही राज ठाकरे इफेक्ट..?

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये नेमक्या या सगळ्या घडामोडी घडण्यामागचं कारण राज ठाकरे इफेक्ट आहे की आणखी काही, असाही सवाल उपस्थित केला जातो आहे. खरंतर रामनवमीच्या दिवशी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या.

या घटना सामाजिक शांती भंग करणाऱ्या होता. गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गोव्यात घडलेल्या काही घटनानंतर चिंता व्यक्त केली गेली. या सर्व घटनांचा विचार करता उत्तर प्रदेशातही खबरदारी बाळगली जाते आहे. त्यानुसार नव्यानं काही नियम जारी करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Raj Thackeray: मनसेचं ठरलं! 3 मे रोजी महाआरती आणि हनुमान चालिसा होणारच, राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय; नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray MNS Meet : राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत मुंबईत बैठक, तीन तारखा, तीन ठिकाणं, मनसेचा मास्टरप्लॅन ठरतोय…

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.