Rajasthan: सचिन पायलट निरुपयोगी आणि बिनकामाचे, मी मुख्यमंत्री, इथं भाजी विकण्यासाठी नाही : अशोक गहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत सातत्याने सचिन पायलट यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत (Rajasthan Ashok Gehlot criticize sachin Pilot).
नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. आज राजस्थान उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होत आहे. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत सातत्याने सचिन पायलट यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत (Rajasthan Ashok Gehlot criticize sachin Pilot). आता तर त्यांनी सचिन पायलट यांना थेट निरुपयोगी आणि बिनकामाचं म्हटलं आहे. त्यामुळे हा संघर्ष बराच काळ चालणार असल्याचं दिसत आहे.
अशोक गहलोत आज (20 जुलै) माध्यमांशी बोलताना म्हटले, “मागील एवढ्या मोठ्या काळात तुम्ही कुणीही सचिन पायलट यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावरुन हटवले पाहिजे अशी एकही बातमी पाहिली नसेल. आम्हाला माहिती होतं सचिन पायलट निरुपयोगी आणि बिनकामाचे आहेत. ते काहीही काम करत नाही, उलट सरकार पाडण्यासाठी कारस्थान करत आहेत, आमदारांना एकमेकांच्या विरोधात लढवत आहेत. मात्र, आम्ही पक्षाच्या हितासाठी यावर प्रतिक्रिया दिली नाही.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
#WATCH Sachin Pilot ne jis roop mein khel khela vo bahut durbhagyapurna hai. Kisiko yakeen nahi hota ki yeh vyakti aisa kar sakta hai…maasoom chehra, Hindi English par achchi command aur pure desh ki media ko impress kar rakha hai: Rajasthan CM pic.twitter.com/gv51qOe66n
— ANI (@ANI) July 20, 2020
“मागील 6 महिन्यापासून राजस्थानमध्ये भाजपच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी कट रचला जात होता. याची मला कल्पना होती. मी याविषयी इतरांना सांगितलं, राजस्थान सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. मात्र, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. कुणालाही माहिती नव्हतं की या भोळ्या आणि निर्दोष चेहऱ्याचा व्यक्ती असं काम करेल. मात्र, मी येथे भाजी विकण्यासाठी नाही, मी मुख्यमंत्री आहे,” असं अशोक गहलोत म्हणाले.
“निरागस चेहरा, चांगली हिंदी इंग्लिशने माध्यमांना प्रभावित करुन ठेवलं होतं”
अशोक गहलोत म्हणाले, “सचिन पायलट यांनी ज्या प्रकारे हा राजकीय खेळ खेळला तो दुर्दैवी आहे. हा व्यक्ती असं करेल यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. निरागस चेहरा, हिंदी इंग्लिशवर कमांड आणि देशातील माध्यमांना फक्त प्रभावित करुन ठेवलं आहे.”
“बंदिस्त करुन ठेवलेले आमदार फोन करुन रडत आहेत”
गहलोत यांनी पायलट यांच्यावर आमदारांना जबरदस्तीने बंदीस्त करुन ठेवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “आमचे आमदार कोणत्याही निर्बंधांसह राहत आहेत. मात्र त्यांच्या आमदांना बंदिस्त करुन ठेवण्यात आलं आहे. ते आम्हाला फोन करुन रडत आहेत आणि त्यांच्या अवस्थेविषयी सांगत आहेत. त्यांचे मोबाइल फोन त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत. त्यातील काही आमदार आमच्याकडे परत येऊ इच्छित आहेत.”
हेही वाचा :
उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनासाठी पवारांच्या NOC ची गरज नसावी : प्रवीण दरेकर
शरद पवारांचं विधान मोदींविरोधी नव्हे तर श्रीरामांविरोधात, पवार तर रामद्रोही : उमा भारती
उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात…
Rajasthan Ashok Gehlot criticize sachin Pilot