Rajeev Satav Death | राजीव सातव यांच्या जाण्याने आम्ही प्रतिभाशाली नेत्याला मुकलो: प्रियंका गांधी
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. (Rajeev Satav passes away, priyanka gandhi and other leaders console death)
नवी दिल्ली: काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे. (Rajeev Satav passes away, priyanka gandhi and other leaders console death)
कोरोनाचा संसर्ग झाल्याने गेल्या 23 दिवसांपासून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या राजीव सातव यांची झुंज आज अखेर संपली. आज पहाटे 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सातव यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. ”राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत. ते निर्मळ मनाचे, प्रामाणिक आणि काँग्रेसच्या आदर्शाशी कटिबद्ध असलेले आणि भारतीय जनतेला समर्पित असलेले नेते होते. माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांना त्यांच्याशिवाय पुढे जाण्याची शक्ती मिळो,” अशी भावना प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
In Rajeev Satav we have lost one of our brightest colleagues. Clean of heart, sincere, deeply committed to the ideals of the Congress & devoted to the people of India.
I have no words, just prayers for his young wife & children. May they have the strength to carry on without him pic.twitter.com/Z1q6UPmkbK
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2021
मित्राला गमावले: राहुल गांधी
“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
दोस्ती सदैव स्मरणात राहील: सुरजेवाला
काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. युवक काँग्रेसमध्ये आम्ही दोघेही एकाचवेळी आलो. तेव्हापासून आजवर आम्ही एकत्र होतो. राजीव सातव अत्यंत साधे होते. त्यांचं हास्य, जमिनीवरील नेता, नेतृत्व आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेसह त्यांच्या मैत्रीची कायम आठवण येईल. जहाँ रहो, चमकते रहो, अशा शब्दात सुरजेवाला यांनी भावना व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राची मोठी हानी: गडकरी
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 16, 2021
अभ्यासून नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: फडणवीस
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ? या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 16, 2021
चांगलं व्यक्तिमत्व गमावलं: संभाजी छत्रपती
माझे राज्यसभेतील सहकारी आणि चांगले व्यक्तीमत्व राजीव सातव यांचे दुखःद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत संवेदना व्यक्त करतो. आपण कोविड-१९ला गांभीर्याने घेऊन खबरदारी घेणं आवश्यक आहे. हीच त्यांना श्रद्धांजली असेल, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
परम मित्र गमावल्याचे दु:ख कायम राहील: मुंडे
जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील, अशी भावना व्यक्त करतानाच हिंगोली जिल्ह्यातील एका शहीद सैनिक पत्नीला सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून जमीन मिळावी यासाठी माझ्याशी संपर्क करून पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहास्तव विशेष बाब म्हणून त्या शहीद सैनिक पत्नीला आम्ही मदत केली. सामान्य माणसाच्या कामाची कणव राजीव सातवांच्या कामातून दिसत असे, अशी आठवणही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितली. (Rajeev Satav passes away, priyanka gandhi and other leaders console death)
जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खा. राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. (1/2)#RajeevSatav pic.twitter.com/NRs7djd2Lv
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 16, 2021
संबंधित बातम्या:
Rajeev Satav Death | महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त, मोठा धक्का बसलाय : शरद पवार
MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी
(Rajeev Satav passes away, priyanka gandhi and other leaders console death)