Breaking : भारतीय किसान युनियनमधून राकेश टिकैत यांची हकालपट्टी, त्यांचे भाऊ नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन हटवले
राकेश टिकैत ज्या पद्धतीने वर्तणूक करत होते, त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर संतापलेले होते, असेही सांगण्यात येते आहे. दुसरीकडे टिकैत परिवाराच्या समर्थकांनी यामुळे आता संघटनेत फूट पडेल असे संकेत दिले आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांचे भाऊ नरेश टिकैत (Naresh Tikait) यांनाही अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले आहे. नरेश यांच्या ऐवजी आता राजेश चौहान (Rajesh Chauhan) यांना संघटनेच्या अध्यक्षपदी स्थान देण्यात आले आहे. टिकैत परिवारावर संघटनेतील लोकं नाराज होते, असे सांगण्यात येते आहे. राकेश टिकैत ज्या पद्धतीने वर्तणूक करत होते, त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर संतापलेले होते, असेही सांगण्यात येते आहे. दुसरीकडे टिकैत परिवाराच्या समर्थकांनी यामुळे आता संघटनेत फूट पडेल असे संकेत दिले आहेत.
भारतीय किसान युनियनचे संस्थापक दिवंगत चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीला रविवार 15 मे रोजी लखनऊ इथे ऊस उत्पादक शेतकरी संस्थेत बीकेयू नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीत टिकैत बंधू यांच्याविरोधात निर्णय घेण्यात आला. टिकैत परिवाराविरोधात शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या मनात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता बीकेयूमध्ये दोन गट पडण्याचे संकेत मिळत आहेत.
अराजकीय संघटनेला राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप
भारतीय किसान युनियनचे अनेक सदस्य संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या कारभारावर नाराज होते. राकेश टिकैत यांनी आपल्या राजकीय वक्तव्यांनी अराजकीय संघटनेला राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला, असा अनेक शेतकरी नेत्यांचा आरोप आहे.
राकेश टिकैत यांचं ट्वीट
चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त राकेश टिकैत यांनी 8 तासांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. ‘तुमचा संघर्ष आणि लढाई या देशातील शेतकरी, मजूर, आदिवासी, दलित शुद्र, आदींसाठी लढण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत निरंतर करत राहू. तुमच्यासोबतचे ते संघर्षाचे दिवस आमच्या आठवणीत आहेत. सदा तुमचा राकेश टिकैत.’ राजेश टिकैत यांचं हे ट्वीट हरियाणाच्या भारतीय किसान युनियनच्या ट्विटरवरुनही रिट्वीट करण्यात आलं आहे.
आपके संघर्ष व आपकी लड़ाई इस देश के किसान, मजदूर ,आदिवासी ,दलित शुद्र ,पिछड़ों के लिए लड़ने की कोशिश अंतिम सांस तक निरंतर करते रहेगे आपके साथ बिताए संघर्ष के वो दिन याद है हमें। कोटि-कोटि नमन व चरण स्पर्श?????? । सदा आपका राकेश टिकैत@AHindinews @PTI_News @OfficialBKU pic.twitter.com/M5zjL3eTZX
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) May 15, 2022