मग शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?; शेतकरी नेते टिकैत यांचा संतप्त सवाल
दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला आज हिंसक वळण लागलं आहे. (rakesh tikait reaction on farmers protest in delhi)
नवी दिल्ली: दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला आज हिंसक वळण लागलं आहे. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उसळली असून शेतकऱ्यांना नियंत्रित शक्य नाही. पोलिसांनी केलेल्या या लाठीमारवर भारतीय किसान यूनिनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का? असा संतप्त सवाल करतानाच आंदोलनाला हिंसक वळण देणारे शेतकरी आंदोलक हे भरकटलेले आहेत, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. (rakesh tikait reaction on farmers protest in delhi)
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने त्यावर राकेश टिकैत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ट्रॅक्टर रॅली शांततापूर्ण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. याआधी गाजीपूर बॉर्डरवरून शेतकऱ्यांची रॅली सुरू होण्यापूर्वी टिकैत यांनी मीडियाशी संवाद साधला होता. आम्हाला पोलिसांनी रॅलीसाठी मार्ग दिला आहे. त्याच मार्गाने आम्ही जात आहोत. आमचे आंदोलन थांबणार नाही. नियमांचं पूर्ण पालन केलं जाईल, असं टिकैत म्हणाले होते. मात्र, शेतकऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गाने ट्रॅक्टर रॅली न काढता वेगळ्याच मार्गाने रॅली काढली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यातच शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने पोलिसांनी बचावासाठी लाठीमार केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. हजारो शेतकऱ्यांचा संताप उसळल्याने या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. (rakesh tikait reaction on farmers protest in delhi)
संबंधित बातम्या:
पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप
दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज
प्रजासत्ताक दिनी दिल्ली धुमसली, शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक, संयमी रॅली ते अंसतोष, वाचा सविस्तर
(rakesh tikait reaction on farmers protest in delhi)