Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी आंदोलनाला रिहाना ते ग्रेटाच्या पाठिंब्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?

शेतकरी आंदोलनाला पॉपस्टार रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफानं पाठिंबा दिला आहे. Rakesh Tikait foreign celebrities

शेतकरी आंदोलनाला रिहाना ते ग्रेटाच्या पाठिंब्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?
राकेश टिकैत
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 7:16 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 72 वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनाला पॉपस्टार रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा अशा परदेशातील व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. मात्र, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मी त्या व्यक्तींना ओळखत नसल्याचं वक्तव्य केलं आहे. ग्रेटा थनबर्गविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.(Rakesh Tikait said he don’t know them about support of foreign celebrities)

परदेशातील सेलिब्रेटी व्यक्तींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याच्या प्रश्नावर राकेश टिकैत यांनी त्यांना ओळखत नसल्याचं म्हटलं. टिकैत यांनी यावेळी संयुक्त किसान मोर्चासोबत केंद्र सरकारनं पहिल्यासारखी चर्चा करावी. शेतकरी सरकारशी चर्चेला तयार आहेत, असं वक्तव्य केलं आहे. पण, सरकारला हा विषय लांबवून आंदोलन वाढवायचं असल्याचं दिसतंय, शेतकरी सरकारशी चर्चेसाठी तयार आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असं राकेश टिकैत म्हणाले.

शेतकरी आंदोलनाला कुणी दिला पाठिंबा

अमेरिकेतील पॉपस्टार गायिका रिहाना, स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेतील अभिनेत्री अमांडा केरनी, गायक जे सीन, डॉ. जियस, मिया खलिफा, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर, भारत सरकारनं शेतकरी आंदोलन अंतर्गत विषय असल्याचं म्हटलंय.

दिल्ली पोलिसांकूडन ग्रेटा विरोधात गुन्हा दाखल

पॉप सिंगर रिहानाने भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतर ग्रेटानेही त्याचं समर्थन केलं होतं. ग्रेटाने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे ही बाब लक्षात आली आहे की, भारताविरोधात प्रचार करण्यासाठी विचारपूर्वक एक कट रचण्यात आला आहे. त्याचे काही पुरावेही मिळाले आहेत. भारताविरोधात कॅम्पेनिंग राबवण्याबाबतचा एक पूर्ण अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यात पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचंही नाव समोर आलं आहे. ही फाऊंडेशन म्हणजे कॅनडामधील एक NGO आहे. या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यावर ग्रेटाने ट्विट केलं आहे. कोणत्याही धमकीचा काहीही फरक पडणार नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील, असं ग्रेटाने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Greta Thunberg | दिल्ली पोलिसांकडून ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR, भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप

Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट

(Rakesh Tikait said he don’t know them about support of foreign celebrities)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.