Ram mandir : राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांना प्राणप्रतिष्ठेसाठी येण्याचे निमंत्रण

Ram Mandir : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणाऱ्या कामगारांना देखील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी मोजक्यात लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे.

Ram mandir : राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांना प्राणप्रतिष्ठेसाठी येण्याचे निमंत्रण
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 9:27 PM

Ayodhya Ram mandir : अयोध्येत श्री रामांचे भव्य असे राम मंदिर तयार होत आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. पण आता बातमी अशी समोर येते आहे की, राम मंदिराच्या उभारणीत भूमिका बजावणाऱ्या काही मजुरांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. ज्या कारसेवकांनी कार सेवेच्या वेळी प्रत्येकी 100 रुपयांची देणगी दिली होती, त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामाचा आढावा घेतला.

सुरक्षेची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षा आणि इतर व्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “अयोध्येत येणाऱ्या मान्यवरांचा आदरातिथ्य व्हावा. प्रत्येक व्हीआयपी अतिथीच्या विश्रांतीची जागा आधीच निवडली पाहिजे. हवामानाचा विचार करता, काही पाहुणे एक-दोन दिवस आधी येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था व्हायला हवी.”

अयोध्येत सुख सुविधा वाढवणार

अयोध्येत अनेक लोकं येणार आहेत. येथे अनेक हॉटेल आणि धर्मशाळा आहेत. तसेच होम स्टेची देखील सुविधा आहे. टेंट सिटींची संख्या देखील वाढवली जाणार आहे. अयोध्येत 25-50 एकरांवर भव्य टेंट सिटी बनवण्याचा विचार आहे.

हे सुद्धा वाचा

22 जानेवारीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर भक्तांना राम मंदिरात दर्शनासाठी येता येणार आहे. जगभरातील राम भक्त अयोध्येत दाखल होणार आहेत. बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी संपूर्ण शहरात विविध भाषांमधील फलक लावण्यात येणार आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.

देशभरात साजरा होणार दिपोत्सव

22 जानेवारीला दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक जण आपल्या दारात दिवा लावणार आहे. श्री रामांचं अयोध्येत स्वागत करणार आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची संपूर्ण देशात उत्सुकता पाहायला मिळत आहे. अयोध्येत सर्व शासकीय इमारती सुशोभित करण्यात येत आहेत. हा अभिषेक सोहळा अयोध्येत थेट प्रक्षेपित होणार आहे.

राम मंदिराचा संघर्ष खूप वर्षांपासून सुरु होता. अखेर आता राम मंदिर बनून तयार होत आहे. मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरम आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.