Ram Mandir | परदेशात ‘या’ मंदिरात झालेला श्री राम-सीता मातेचा विवाह, तिथे मिळतो अखंड सौभाग्याचा सिंदूर
Ram Mandir | भारतात अयोध्या नगरीत भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिराची सर्वत्र चर्चा आहे. भारतातच नाही परदेशातही राम मंदिर आहेत, ज्याच खास महत्त्व आहे. परदेशात असच एक सीता मातेच मंदिर आहे, तिथला सिंदूर खूप खास आहे.
Ram Mandir | येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामललाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. सध्या सगळा देश प्रभ रामचंद्र आणि सीता मातेच्या भक्तीमध्ये मग्न आहे. सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण असताना आम्ही तुम्हाला सीता मातेच्या एका प्रसिद्ध मंदिराबद्दल माहिती देणार आहोत. विवाहित महिलांसाठी हे मंदिर खूप खास आहे. या प्रसिद्ध मंदिराबद्दल विस्ताराने जाणून घ्या.
माँ जानकीच मंदिर नेपाळच्या जनकपूर धाममध्ये आहे. नेपाळची राजधानी काठमांडूपासून हे मंदिर 400 किलोमीटर अंतरावर आहे. हिंदू समाजाला या मंदिराबद्दल प्रचंड आस्था आहे. सीतेचे वडिल राजा जनक यांच्या नावावर या मंदिराच नाव ठेवण्यात आलं आहे. सीता मातेच हे प्रसिद्ध मंदिर 4860 वर्गफीटमध्ये पसरलेलं आहे.
सीता मातेच हे मंदिर खास का आहे?
धार्मिक मान्यतेनुसार, जानकी मंदिर महिलांसाठी खूप खास आहे. या मंदिरातील सिंदूराच विशेष महत्त्व आहे. या मंदिरातील सिंदूर लावल्यास सौभाग्याला अमरत्व मिळते, असं म्हणतात. या मंदिरातील सिंदूरामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि वैवाहिक जीवनात समृद्धी येते.
म्हणूनच महिलांमध्ये हे मंदिर विशेष लोकप्रिय
Janki Mandir च्या जवळच ती जागा आहे, जिथे प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचा विवाह झाला होता. या विवाह कुंडाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. अशी मान्यता आहे की, या विवाह मंडपाच दर्शन घेतल्यानंतर इथला सिंदूर लावल्यानंतर विवाहित स्त्रीच सौभाग्य अखंड राहत. म्हणूनच इथला सिंदूर महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. नवऱ्याच्या दीर्घायुषासाठी महिला इथला सिंदूर आपल्या डोक्यामध्ये भरतात.