Ram mandir : राम मंदिराच्या नावाखाली अशी सुरु आहे फसवणूक, आताच सावध व्हा

Ram Mandir prasad : राम मंदिराचे उद्घाटनाबाबत देशात आनंदाचे वातावरण आहे. राम मंदिर हे सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळेच देशात पुन्हा एकदा दिवाळीचं वातावरण आहे. राम मंदिरात येण्यासाठी सर्वजण उत्सूक आहेत. पण याचा काही लोकं गैरफायदा घेत आहेत. राम मंदिराच्या नावाखाली कशी फसवणूक सुरु आहे जाणून घ्या.

Ram mandir : राम मंदिराच्या नावाखाली अशी सुरु आहे फसवणूक, आताच सावध व्हा
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 5:10 PM

Ram mandir scam : राम मंदिराच्या भव्य उद्घाटनासाठी देशभरात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्ती २२ जानेवारीची वाट पाहत आहे. प्रभु रामावर जवळपास सर्वांची श्रद्धा आहे. सध्या रामभक्त अयोध्येला पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भक्तांना राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. पण ज्यांना आता जाता येत नाही ते प्रसाद कसा मागवायचा, आधी कुठे दर्शन घ्यायचे, अशा अनेक प्रश्नांबाबत गुगलवर सर्च करत आहेत. अशा परिस्थितीत या संधीचा काही समाजकंठक फायदा घेत आहेत. तुम्हाला लुटण्यासाठी घोटाळेबाजांनी नवी पद्धत सुरु केली आहे. ज्यामध्ये बनावट वेबसाइट आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे.

प्रसादाच्या नावाखाली फसवणूक

सध्या https://khadiorganic.com/ ही वेबसाइट खूप व्हायरल होत आहे. ते तुमच्या घरी रामलला प्रसाद पोहोचवतील असा दावा केला जात आहे. पण यातून तुमची फसवणूक होत आहे. या वेबसाईटवर सुरुवातीला मोफत प्रसाद मिळवण्याचा पर्याय दिला जात होता. तुम्ही त्यावर क्लिक करून प्रसाद निवडल्यास आणि चेकआउट केल्यास तुम्हाला ५१ रुपये द्यावे लागतील.

काही काळानंतर या वेबसाईटवर मोफत प्रसाद मिळवण्याचा पर्याय देण्यात आला ज्यामध्ये चेकआउटच्या वेळी तासांचा प्रतीक्षा कालावधी दर्शविला गेला. आता या वेबसाइटवर एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की मोठ्या ऑर्डरमुळे प्लॅटफॉर्म आणखी ऑर्डर घेऊ शकत नाही.

एका व्यक्तीने जर 51 रुपये प्रसादासाठी दिले असते, तर त्याला लाखो रुपयांचा फायदा झाला असेल. जर तुम्ही देखील या वेबसाईटवरुन मोफत प्रसाद मागवला असेल तर तुमची फसवणूक झाली आहे.

सरकारकडून कोणतीही माहिती नाही

सर्वांना मोफत प्रसाद मिळावा यासाठी कोणतीही वेबसाइट किंवा अशा कोणत्याही सेवेबाबत सरकारकडून कोणताही संदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा खोट्या अफवांपासून सावध राहा. कुठेही पैसे देऊ नका. यातून तुमची फसवणूक होऊ शकते.

देणगी देण्यासाठी अधिकृत वेबसाईट

देणगीसाठी कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. व्हॉट्सअॅप किंवा इन्स्टाग्रामवर डोनेशनच्या नावाने येणाऱ्या अनेक लिंक्स व्हायरल होत आहेत, अशा परिस्थितीत लिंकची पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

दानासाठी राम मंदिराच्या अधिकृत वेबसाइटची मदत घ्या. https://srjbtkshetra.org/donation-options/ या लिंकवर जा. येथे तुम्हाला ऑनलाइन डोनेशनचा पर्याय मिळत आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.