Ram mandir : अयोध्येला छावणीचं स्वरुप, आधुनिक शस्त्र घेऊन गस्त घालताय एटीएसचे जवान
Ayodya Ram mandir security : राम मंदिराची जबाबदारी २२ वर्षापर्यंत सीआरपीएफकडे होते. काही दिवसांपूर्वीच राम मंदिराची जबाबदारी आता यूपीच्या एटीएस यूनिटकडे देण्यात आली आहे. अयोध्येतील सोहळ्यासाठी संपूर्ण शहरात चोख पोलीस व्यवस्था आहे. संपूर्ण शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.
Ayodhya Security : अयोध्येत राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला अनेक मोठे नेते, कलाकार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिवाय इतर सात हजार लोकांना देखील येथे येण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. २३ जानेवारी पासून हे मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. राम मंदिरातील हा सोहळा कोट्यवधी भाविक पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. अयोध्येला सध्या त्यामुळे छावणीचे स्वरुप आले आहे. जागेजागेवर यूपीच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) जवान तैनात आहेत.
अयोध्येत मोठी सुरक्षा व्यवस्था
राम मंदिराच्या उद्घाटनाआधीच संपूर्ण अयोध्येला जवानांनी सुरक्षित केले आहे. गेल्या २२ वर्षांपासून राम मंदिराची सुरक्षा सीआरपीएफ जवानांकडे होती. पण ती सुरक्षा आता यूपी पोलिसांच्या एटीएसकडून देण्यात आली आहे. एटीएसचे जवान संपूर्ण शहरात जागोजागी पाहणी करत आहेत. UP पोलिसांनी सुरक्षेसाठी यंत्रणा तयार केली आहे. ड्रोनही संपूर्ण शहरावर लक्ष ठेवले जात आहे. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) सैनिकही दुचाकीवर शहरात गस्त घालत आहेत.
2007 मध्ये दहशतवादविरोधी पथकाची स्थापना
राज्यातील दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी यूपी सरकारने 2007 मध्ये दहशतवादविरोधी पथकाची स्थापना केली होती. एटीएस ही यूपी पोलिसांची विशेष युनिट आहे. त्याचे मुख्यालय लखनऊमध्ये आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमाची जबाबदारी एटीएसकडे दिली जाते. गुन्हेगार-माफिया यांच्यावर कारवाई करण्यासाठी देखील यूपी एटीएसची मदत घेतली जाते.
#WATCH | Uttar Pradesh: Commandos of UP ATS deployed at the Lata Mangeshkar Chowk in Ayodhya ahead of the Ram Temple Pran Pratishtha ceremony. (17.01)
(Earlier visuals) pic.twitter.com/Ge4feaWvJb
— ANI (@ANI) January 17, 2024
या जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. विपरीत परिस्थितीत कारवाई करण्याचे ट्रेनिंग त्यांना दिले जाते. ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत कारवाई करण्यासाठी सज्ज असतात. यांना विशेष प्रकारचे हत्यारे देखील दिली जातात. ज्यामुळे ते त्वरीत अॅक्शनमध्ये येतात.