भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू, दिल्लीतील घरात मृतदेह आढळला

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. (Ram Swaroop Sharma, Mandi MP, Found Dead in Delhi Home; Suicide Suspected)

भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू, दिल्लीतील घरात मृतदेह आढळला
Ram Swarup Sharma
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:32 AM

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाशेजारीच शर्मा यांचा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नसून त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Ram Swaroop Sharma, Mandi MP, Found Dead in Delhi Home; Suicide Suspected)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8.30 वाजता त्यांना गोमती अपार्टमेंटमध्ये खासदार रामस्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची खबर मिळाली. पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे. दरम्यान, शर्मा यांच्या मृत्यूमुळे भाजपच्या संसदीय दलाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.

कोण आहेत रामस्वरुप शर्मा

रामस्वरुप शर्मा हे हिमाचल प्रदेशातील जोगिंदरनगरचे रहिवासी आहेत. ते सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. खासदार बनण्यापूर्वी ते मंडी जिल्ह्याचे भाजपचे सचिव होते. त्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजपचे सचिव होते. ते हिमाचल प्रदेशच्या फूड अँड सिव्हील सप्लाय कॉर्पोरेशनचे अध्यक्षही होते.

सलग दुसऱ्यांदा विजयी

भाजपने शर्मा यांना 2014मध्ये लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांचा 40 हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत हिमाचलच्या सर्वच्या सर्व चारही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. 2019मध्ये ही शर्मा यांनी मंडीमधून निवडणूक लढली होती आणि विजयी झाले होते. (Ram Swaroop Sharma, Mandi MP, Found Dead in Delhi Home; Suicide Suspected)

संबंधित बातम्या:

‘2 मुलींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप’, न्याय न मिळाल्याने पीडित आई थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना, फटाक्यांच्या आतषबाजीवेळी आग!

मोदींचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांचा राजीनामा; दिलं ‘हे’ कारण!

(Ram Swaroop Sharma, Mandi MP, Found Dead in Delhi Home; Suicide Suspected)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.