मोठी बातमी ! मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपात प्रवेश
प्रसिद्ध टीव्ही सिरियल 'रामायण'मध्ये श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपात प्रवेश केला आहे (Ramayana Fame Arun Govil join BJP).
नवी दिल्ली : रामानंद सागर निर्मित प्रसिद्ध टीव्ही सिरियल ‘रामायण’मध्ये श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत भाजपात प्रवेश केला. रामानंद सागर यांनी निर्मित केलेल्या रामायणात गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे देशातील कोट्यवधी हिंदूंसोबत गोविल यांच्याशी भावनिक नातं आहे. आरुण गोविल यांच्या प्रवेशामुळे भाजपला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे (Ramayana Fame Arun Govil join BJP).
Actor Arun Govil, best known for playing lord Ram in Ramayan TV series, joins Bharatiya Janata Party (BJP) in Delhi. pic.twitter.com/ddEfyQGFS2
— ANI (@ANI) March 18, 2021
सीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री याआधीच भाजपात
देशात 1987 मध्ये दूरदर्शन वाहिनीवर रामायण प्रक्षेपित केलं जायचं. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्या काळात ही मालिका बघण्यासाठी घराघरात प्रचंड गर्दी जमायची. लोकांनी मालिकेतील कलाकारांना डोक्यावर घेतलं होतं. या मालिकेतील कलाकारांप्रती लोकांच्या मनात एक वेगळा आदर आहे. या मालिकेत सीताची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी याआधीच भाजपात प्रवेश केला आहे.
पाच राज्यांमधील निवडणुकीत गोविल यांना कोणती जबाबदारी?
देशातील पाच राज्यांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, पदुचेरी, आसाम, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अरुण गोविल यांना नेमकी काय जबाबदारी देण्यात येईल, याबाबत अजून स्पष्ट झालेलं नाही.
अरुण गोविल यांच्याविषयी थोडक्यात माहिती
अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला. त्यांनी रामायण व्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘विक्रम और बेताल’, ‘लव कुश’, ‘बुद्ध’ अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. त्याचबरोबर ‘पहेली’, ‘सावन’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.