रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची ‘या’ राज्यातही एन्ट्री, 10 जागांवर लढणार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे (Ramdas Athawale on Assam Election 2021)

रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची 'या' राज्यातही एन्ट्री, 10 जागांवर लढणार
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 9:45 PM

दिसपूर (आसाम) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. ते रविवारी गुवाहाटीच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान पत्रकारांसोबत बोलताना आगामी आसामच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागांवर लढेल, अशी घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपसोबत युती करु, असंही त्यांनी सांगितलं (Ramdas Athawale on Assam Election 2021).

आठवले नेमकं काय म्हणाले?

“आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागांवर आपले उमेदवार उभे करेल. एनडीएचा मित्रपक्ष असल्याने आरपीआय लवकर राज्यातील युतीबाबत भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बातचित करेल”, असं आठवले यांनी सांगितलं (Ramdas Athawale on Assam Election 2021).

“या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत सर्बानंद सोनोवाल नक्की पुन्हा मुख्यमंत्री होतील. माझ्या आरपीआय पक्षाचा त्यांना पाठिंबा असेल. जर आरपीआय दहा पैकी पाच-सहा जागांवर विजयी झाली तर आम्ही भाजपसोबत युती करुन बहुमताने एकत्र येऊ”, असं रामदास आठवले म्हणाले.

येत्या मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल आणि केरळसह आसाम राज्यातही विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 2016 च्या निवडणुकीत तिथे भाजप सर्वाधिक 60 जागांवर विजयी होऊन मोठा पक्ष बनला होता. आसाममधील भाजप सरकारला सध्या आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटचा पाठिंबा आहे.

हेही वाचा : प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.